शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

राजकारण संसदेतून सडकेवर अन् सर्वसामान्य वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:58 AM

संसदेत एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेल्या दोन्ही बाजू आता सडकेवर उतरतील. राज्यसभेत विरोधी खासदारांना आवरण्यासाठी बाहेरच्या लोकांना बोलविण्यात आले, असा आरोप करीत विराेधकांनी लगेच सडकेवरील लढाईचे रणशिंंगही फुंकले.

संसदेचे कामकाज ठप्प पडल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कक्षात चर्चेसाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची देहबोली पाहिली तर देशाचे सत्ताधारी व विरोधक यांच्यात किती कमालीची, टोकाची कटुता आहे हे लक्षात येईल. झालेच तर संसदेत गेले तीन आठवडे जे काही सुरू होते त्यासाठी दोन्ही बाजू जबाबदार असल्याचे व त्याबद्दल नेत्यांना फारशी फिकीर नसल्याचे दाखविणारेही ते दृश्य होते. पावसाळी अधिवेशन सरकारला दोन दिवस आधीच गुंडाळावे लागले. संसदेत एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेल्या दोन्ही बाजू आता सडकेवर उतरतील. राज्यसभेत विरोधी खासदारांना आवरण्यासाठी बाहेरच्या लोकांना बोलविण्यात आले, असा आरोप करीत विराेधकांनी लगेच सडकेवरील लढाईचे रणशिंंगही फुंकले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व त्याच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून संसदेतील गोंधळाला विरोधकच कसे जबाबदार आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल.

देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा विळखा अजून पुरेसा सैल झाला नसताना गेल्या १९ जुलैला हे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. तेव्हा जनतेची इच्छा नक्कीच ही असेल की महामारीने घेतलेले बळी, बाधितांना आर्थिक व भावनिक दिलासा, अडचणीत आलेली अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण अशा मुद्द्यांवर आपण निवडून दिलेले प्रतिनिधी लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिरात चर्चा करतील. त्यातून सामान्यांच्या पदरात काही तरी पडेल. तथापि, जगभरातील पत्रकारांच्या चमूने विविध देशांचे राज्यकर्ते, उद्योजक, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, सामाजिक व मानवाधिकार कार्यकर्ते आदींच्या फोनमध्ये पेगासस नावाचे सॉफ्टवेअर टाकून हेरगिरी केल्याचे प्रकरण अधिवेशनाच्या आदल्या दिवशी उजेडात आले. या मुद्द्यावर मोठे राजकीय रणकंदन माजणार हे नक्की झाले.
सोबतीला गेल्या दहा महिन्यांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि इंधन दरवाढ असे विषय होतेच. सत्ताधारी व विरोधक दोघेही आपापल्या मुद्द्यांवर अडून राहिले. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे विरोधक जोरात असल्याचे दिसले. याच तीन आठवड्यात ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा, तसेच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या शरद पवार आणि गांधी मायलेकांशी भेटीगाठी, विरोधकांच्या नव्या व्यूहरचनेची तयारी याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. पेगासस सॉफ्टवेअर केवळ सरकारांनाच दिले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकार विराेधकांच्या आरोपांना व मागणीला प्रतिसाद देईल असे वाटत होते. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांमधील परिस्थिती अधिकच चिघळत गेली. विधेयकांचे कागद फाडणे, ते सभागृहाचे कामकाज चालविणाऱ्या मान्यवरांवर फेकणे, मधल्या हौदात वारंवार उतरणे, नारेबाजी व गाेंधळ आणि अखेरच्या दिवशी अक्षरश: मार्शलचा वापर करून गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर काढणे इतके सारे होत राहिले.नाइलाजाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभेचे पदसिद्ध सभापती, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना अधिवेशनाचे कामकाज दोन दिवस आधीच थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला.  सभागृहातील गोंधळ पाहून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यात तर अश्रू आले. लोकसभेत ९६ तास कामकाज अपेक्षित असताना केवळ २१ तास १४ मिनिटेच झाले, तर राज्यसभेत ९७ तास ३० मिनिटांऐवजी फक्त २८ तास २१ मिनिटेच ते झाले. लोकसभेत गेल्या दोन दशकांमधील तिसऱ्या क्रमांकाच्या २१ टक्के किमान कामकाजाची नोंद झाली तर २८ टक्के हे राज्यसभेतील आठव्या क्रमांकाचे किमान कामकाज ठरले. या वीस वर्षांतील नीचांक २०१०च्या हिवाळी अधिवेशनात अनुक्रमे ६ व २ टक्के असा आहे. तेव्हा भाजप विरोधात तर काँग्रेस सत्तेवर होती. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या मुद्द्यावर भाजपने संसद ठप्प केली होती. कामकाज ठप्प करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार, संसदीय आयुध आहे, असा तेव्हा भाजप नेत्यांचा युक्तिवाद होता. आता मात्र त्यांना विराेधकांची कृती लोकशाहीची विटंबना वाटते. सत्ताधारी व विरोधक या दोघांच्या हटवादीपणामुळे ही स्थिती उद‌्भवली. मतांच्या राजकारणासाठी दोघे कसे एकत्र येतात हे मागास जाती ठरविण्याच्या मुद्द्यावरील घटनादुरुस्तीच्या निमित्ताने दिसले. सरकारने गोंधळातच लोकसभेत वीस व राज्यसभेत एकोणीस अशी महत्त्वाची विधेयके संमत करून घेतली.  सामान्यांच्या पदरात काय वाढून ठेवले आहे, हे आता सडकेवर स्पष्ट होत जाईल.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस