शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

कोरोना संकट काळातील लूटमार कशी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:47 IST

संकटातही लोकांची पिळवणूक करण्याची, त्यांची लूट करण्याची प्रवृत्ती ही आपली मोठी समस्या आहे. एरवी देशप्रेमाच्या गप्पा करणारे संधी मिळताच खिसेकापू होतात. भांडवलशाहीची स्तुती करणारे युरोप, अमेरिकेतील देशांमधील सक्षम सरकारी आरोग्य व्यवस्था दुर्लक्षित करतात.

कोरोना अनेकांकरिता जीवघेणी आपत्ती ठरली असली तरी खासगी रुग्णालये, काही डॉक्टर्स, पॅथॉलॉजिकल लॅब, रुग्णवाहिका पुरविणारे ठेकेदार, औषधांचे वितरक व विक्रेते, स्मशानभूमीतील कर्मचारी आदींकरिता इष्टापत्ती ठरली आहे. मार्च महिन्यापासून ‘कोरोना’च्या नावाने काही ‘दरोडेखोर प्रवृत्ती’च्या लोकांच्या टोळ्यांनी लक्षावधी कुटुंबांची लूट सुरू ठेवली आहे. आता या तक्रारींनी कळस गाठल्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला झोपेतून जाग आली. खासगी रुग्णालये, रुग्णवाहिका यांच्याकडून सरकारने ठरवून दिलेले दर आकारण्यात येत आहेत किंवा कसे, याची पडताळणी करण्याकरिता भरारी पथकांची स्थापना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले.

मुंबईत कोरोनाने थैमान घातल्यावर लागलीच सरकार व महापालिकांनी आपली सर्व ताकद पणाला लावून कोरोना आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न केले. मुंबई महापालिकेची तिजोरी याकरिता रिती केली गेली. कारण, वरळी कोळीवाड्यातील कोरोना नियंत्रणात आणणे, हा ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता, तर धारावी झोपडपट्टीतील कोरोना रोखला जातो किंवा कसे, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष होते. तशी परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये नाही. तेथील स्थानिक स्वराज्य संस्था अगोदरच आर्थिकदृष्ट्या पंगू आहेत. त्यातच कोरोनामुळे त्यांचा आर्थिक प्राणवायू प्रचंड घटल्याने त्या धापा टाकत आहेत. राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता दिलेल्या निधीतून त्या तथाकथित कोविड रुग्णालयांची उभारणी करत आहेत. महापालिकांनी उभारलेल्या अशा दिखाऊ कोविड केंद्रांमध्ये धड उपचार मिळत नाहीत. गोरगरिबांना दुसरा पर्याय नसल्याने काही मरणाकरिता तेथे येतात. मात्र, ज्यांच्याकडे आरोग्यविमा आहे किंवा ज्यांची सरकारदरबारी ओळख आहे, अशी मंडळी या केंद्राच्या वाऱ्याला जात नाहीत. थेट खासगी रुग्णालयांत जातात.
अनेक छोट्या-मोठ्या शहरांमध्ये कोरोना संकट नसताना सहसा रुग्ण ज्या रुग्णालयांमध्ये पाऊलही ठेवत नव्हते, अशा रुग्णालयांनी आपल्याला ‘कोविड रुग्णालय’ जाहीर करवून घेतले आहे, असे अनेक डॉक्टर उघडपणे मान्य करतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या तुटीचा वचपा काढणे, हे एकमेव ब्रीद ही खासगी रुग्णालये जपत आहेत. त्यामुळे रुग्णांना भरमसाठ बिले लावणे, कोविडवरील इंजेक्शन्स आणण्यास भाग पाडून त्यापैकी किती दिली याचा तपशील न देणे असे उद्योग सुरू आहेत. काही खासगी रुग्णालये कोविड पेशंट व त्यांच्या नातलगांचा संवाद होऊ देत नाहीत. त्यामुळे आपला रुग्ण कसा आहे, त्यांना कोणते उपचार दिले जात आहेत, आपण आणून दिलेली इंजेक्शन्स दिली किंवा कसे, याची माहिती नातलगांना कळत नाही.
कोरोनावरील अनेक इंजेक्शन्सचा प्रचंड काळाबाजार आजही सुरू आहे. दोन-चार ठिकाणी धाडी घालून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काळाबाजार रोखल्याचा दिखावा केला असला, तरी इंजेक्शनकरिता दारोदार फिरणाऱ्या रुग्णांच्या नातलगांच्या कहाण्या दररोज ऐकू येतात. कोरोनाच्या तपासणीकरिता पॅथॉलॉजिकल लॅब मनमानी पद्धतीने दर आकारणी करतात. सीटी स्कॅन किंवा एक्स-रेकरिताही गर्दी असल्याने पिळवणूक, लूट सुरू आहे. अनेक रुग्णांची लाखो रुपयांची बिले झाली. ज्यांचा आरोग्यविमा आहे त्यांनी ती भरली. मात्र, ज्यांना ती भरणे अशक्य होते त्यांच्या नातलगांना रुग्णांचे मृतदेह देताना रुग्णालयांनी खळखळ केली.
बिलांवरून बरीच ओरड सुरू झाल्यावर महापालिकांनी लेखापरीक्षण सुरु केले. त्यावर शक्कल म्हणून रुग्णालयांनी रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याच्याकडून आकारलेली रक्कम हेच त्याचे संपूर्ण बिल असल्याचे भासविले. प्रत्यक्षात रुग्ण दाखल असताना वेळोवेळी फोन करून पैसे भरण्यास लावले ती रक्कम दाखविलीच नाही. ज्या रुग्णांच्या नातलगांनी तक्रारी केल्या, त्यांना जुजबी परतावा दिला. हा परतावा लेखापरीक्षकांच्या हस्तक्षेपामुळे मिळाल्याने त्यांचेही हात ओले करणे नातलगांना क्रम:प्राप्त होते. आता भरारी पथके या रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करतील. त्यामुळे रुग्णालयांना त्यांचा ‘वाटा’ द्यावा लागेल. अर्थात त्याचा बोजा रुग्णांच्या डोक्यावर पडेल हे उघड आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या