शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मनाचिये गुंथी - सेकंद

By admin | Updated: April 10, 2017 00:28 IST

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही.

माणसंच माणसांना जवळ करतात, दूर लोटतात. कालचा आज माझा नसतो. आजचा उद्या माझ्याजवळ राहील ही शाश्वती नाही. उद्या माझ्याजवळ कोण येणार माहीत नाही. तेव्हा हा खेळच वेगळा. आपण दान टाकायचं. किती पडतील माहीत नाही. कोण जिंकणार माहीत नाही. अगदी महाभारतातल्या द्यूतपासून हा संघर्ष आहे. म्हणजे आपले जीवन कायम कचकड्यांच्या ताब्यात. पांडव द्यूतामधून वनवासी झाले. खरे तर कैकेयीनेही द्यूतच खेळला. दशरथाला जी मदत केली ती वसूल केली तिने. तिची बाहुली मंथरा होती. आजही आपल्यात मंथरा विविध रूपात वावरतेय. कधी ती सासू असते, कधी प्रेमभंग झालेली प्रेयसी, कधी दुखावलेला मित्र. प्रत्येकजण अशा मंथरेच्या शोधात असतातच. त्याला खरं तर चांगलंच राहायचं असतं. पण आपला कुकर्मी स्वभाव मनुष्यरूपात पाहण्याची त्याची धडपड असते. आपण बऱ्याचदा म्हणतो की हा अगदी बापावर गेला. ती आईवर गेली. या घरातले सगळे चांगले, मग हा असा कसा झाला? म्हणजे हे केवळ वाईट बाबींसाठी नाही तर बघा. रमेश तेंडुलकर मराठीचे सज्जन प्राध्यापक. आपला मुलगा एवढा महान क्रिकेटवीर याचा त्यांना अभिमान होता, पण गर्व नव्हता. सचिन मराठीचा शिक्षक झाला असता तर? हा विनोदच. त्याने चौफेर फटके मारून अवघी मराठी जनता खिळखिळी नव्हे तर खुळी करून सोडली. याबद्दल कुणीच काही म्हणणार नाही. बाप शिपाई, रोजगार हमीचा कामगार पण पोरगा एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन तहसीलदार, कलेक्टर होतो. हा काळाचा महिमाच म्हणायचा. म्हणजे मुलाने मोठं होणं न होणं हे बापाचं भाग्यच. नारायण सुर्वेंचे वडील सुर्वेंना एवढं मोठं पाहू शकले. पण एक गंगाराम सुर्वे हे सच्चे कामगार होते. त्यांनी नारायणला बेवारस पडलेला उचललं, पोसलंं. त्याला नाव दिलं. घर दिलं. आई दिली. हे सगळं येतं कुठून? कुठे शिकला नारायणचा बाप! आणि आईने तरी कुठून दिला पान्हा! माझा मुलगा काय व्हावा हे बाप ठरवू लागला की समजावे पोरगं झालं बाळू! त्याला मोकळं सोडा की बघा. माणूस आपल्या कृतीने ओळखला जातो. अतिशय क्रूरपणे माणसांना मारणारा कसाब लहानपणी त्याची आई अल्लाला दुवा मागताना तो अतिरेकी व्हावा म्हणून प्रार्थना करीत असेल? माणसाचं आयुष्यच विचित्र आहे. ते कधी बदलेल हे सांगता येत नाही. कालचा आज राजा होतो दुसरा रंक होतो. म्हणूनच कोण दिवस येई कसा कोण जाणतो? आपण प्रत्येक दिवसाला हसऱ्या मनाने सामोरं जावं एवढंच आपल्या हाती. कारण आयुष्याचा वेग वर्ष नाही तर सेकंद आहे आणि सेकंद हातात पकडता येत नाही. एखाद्याला म्हटलं तुझ्या यशाचा सेकंद पकड, तर म्हणता म्हणता तो सेकंद दु:खात परिवर्तित होऊ शकतो. म्हणून प्रत्येक सेकंद फुटपाथवरून जाणाऱ्या गाडीसारखा आहे. गाडी सुटली. पकडता आली तर पकडा. नाहीतर नव्या गाडीची वाट पहा! तीही काही सेकंदच! कारण सेकंद असतो काही सेकंदच, नंतर तो ‘सेकंड’ होतो. जुना होतो. चला हा आनंदाचा सेकंद तर पकडू !किशोर पाठक