शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

डिजिटायजेशनला हवा मानवी चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:35 AM

सध्याचे जग हे स्काईप, मल्टीटच, टॅब्लेट्स, मोबाइल अ‍ॅप्स, ‘थ्री’ डी प्रिंटर आणि ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे असून त्यामुळे नव्या संधी उपलब्ध होत असलेले आपण भाग्यवानच समजायला हवे.

- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)सध्याचे जग हे स्काईप, मल्टीटच, टॅब्लेट्स, मोबाइल अ‍ॅप्स, ‘थ्री’ डी प्रिंटर आणि ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे असून त्यामुळे नव्या संधी उपलब्ध होत असलेले आपण भाग्यवानच समजायला हवे. या सर्व गोष्टी आपल्याभोवती असून त्या आपल्या जीवनाचे अंग बनल्या आहेत. अनेक कामे मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ लागली आहेत. त्यात डिशवॉशर, ड्रायव्हरविना चालणारी मोटार कार यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तंत्रज्ञानात सुधारणा होत असल्याने भविष्यात अनेक गोष्टी मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ लागतील; पण दुर्दैवाने त्या मानवी जीवनात हस्तक्षेप करणाऱ्या ठरतील. यंत्राच्या माध्यमातून शिक्षण, कृत्रिम बुिद्धमत्ता, आकडेवारीचे पृथक्करण, इंटरनेट इ. विषयी आपण सतत ऐकत असतो. एकूणच आपण आता डिजिटल विश्वात नांदू लागलो आहोत. सध्याचे जग हे स्मार्ट जग आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीज, स्मार्ट हेल्थकेअर, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फूड, स्मार्ट लर्निंग अशी आपली स्मार्ट दिशेने वाटचाल सुरू आहे.कृत्रिम व्यवस्थेने आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा व ग्रामीण बौद्धिक संपदेचा ºहास होत आहे. मानवतेच्या भवितव्यासाठी हे कितपत चांगले आहे हा वादाचा विषय बनला आहे. आपण सुरुवात कुठून करायची? हे सगळे बुद्धिमत्तेभोवती गुंफलेले असल्याने प्रथम तिचाच विचार करू. मानवी बुद्धिमत्ता ही जटील समजली जाते. तिच्याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि जाणीवजागृती होत असते. त्यामुळे आपण शिकतो, समजून घेतो, तर्कबुद्धीचा वापर करतो, युक्तिवाद करतो, अनेक पद्धती जाणून घेऊ शकतो. कल्पना समजून घेऊ शकतो, योजना आखू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, निर्णय घेतो, माहितीचा संग्रह करू शकतो आणि संपर्कासाठी भाषेचा वापर करू शकतो. हे करणे आपल्याला का शक्य होते? त्यासाठी स्पर्श, दृष्टी, ऐकण्याची क्रिया, गंध, चव या पंचेंद्रियांचा उपयोग आपण करीत असतो. याशिवाय आपल्याला दोन प्रकारच्या जाणिवा असतात. एक जाणीव आपल्या शरीराचा तोल सांभाळून ठेवते तर दुसरी आपल्या हालचालीवर नियंत्रण ठेवते. या सर्व जाणिवांनी आपल्याला आपल्या भोवतालच्या वस्तूजातीचे आकलन होण्यास मदत होत असते. याशिवाय अशा अनेक जाणिवा असतात ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नसते; पण त्या आपल्याला जाणवलेल्या असतात, ज्यामुळे आपले मानवी जग आपल्यासाठी स्मार्ट बनलेले असते. मेंदूची केंद्रीय व्यवस्था या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून त्या उत्तम तºहेने चालाव्यात यासाठी मदत करीत असते.कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी व्यवस्था निर्माण करण्यात येते. त्यात मानवी कार्यक्षमतेचे साम्य आढळून येते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करणारी उपकरणे एकमेकांशी जोडलेली असतात. ती एकमेकांशी संपर्क साधत असतात. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते. या सर्व उपकरणातील माहिती अ‍ॅल्गोरिदमच्या माध्यमातून वेगवेगळे बौद्धिक प्रकार सादर करते. त्याद्वारे निर्णय घेणे सुलभ होते. त्यातून आपण वेगळ्या क्लोनची निर्मिती करू शकतो. तसेच आपल्या काम करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा घडवून आणू शकतो. त्यामुळे पैशाची आणि वेळेचीही बचत होते. माहितीचे हे जंजाळ ब्रान्टोबाइट्स या नावाने ओळखले जाते.डिजिटायजेशनच्या पहिल्या लाटेत कॉम्प्युटिंग, ब्रॉडबॅण्ड आणि मोबाइल टेलिफोनचा समावेश होता. त्याचा लाभ आर्थिक विकासासाठी झाला. साधनांचा जास्त वापर होऊ लागल्यामुळे साधनांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे आर्थिक सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा या क्षेत्रात अधिक मनुष्यबळाची मागणी होऊ लागली. डिजिटायजेशनच्या दुसºया लाटेने नव्या सेवा सुरू झाल्या. जसे, इंटरनेट इन्फर्मेशनचा शोध, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, दूर शिक्षण इ. त्यामुळे नवे रोजगार निर्माण झाले खरे; पण कमी कौशल्य लागणाºया रोजगारांचा ºहास झाला.डिजिटायजेशनच्या तिसºया लाटेने स्मार्ट जग आणले. त्यातून उत्पादनात वाढ होणार असून सार्वजनिक सेवा अधिक कार्यक्षम होणार आहेत. उद्योगात आॅटोमेशनची वाढ होणार असून ती रोजगारांना प्रभावित करेल.कमी प्रतीचे रोजगार नाहीसे होतील आणि उरलेल्या रोजगारांना कौशल्याची गरज भासेल. अर्थात हे सगळे अंदाज आहेत; पण तंत्रज्ञानातील वाढ ही नेहमीच रोजगारांच्या मुळावर उठते असा अनुभव आहे; पण डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग व्यापक प्रमाणात होऊ लागल्याने अनेक घटक एकमेकांशी जोडले जातील आणि त्यात मानवी घटक महत्त्वाचाच राहील. या संदर्भात सरकारने आॅक्सफोर्ड विद्यापीठाने २०१३ केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षाकडे लक्ष पुरवायला हवे. त्यात नमूद केले आहे की आॅटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे पुढील १५ वर्षांत ५० टक्के नोकºया धोक्यात येणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये शारीरिक आणि मानसिक तणाव निर्माण होतील. तेव्हा डिजिटायजेशनला प्रोत्साहन देत असताना सरकारने लोकांना त्याविषयी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. अन्यथा एकूण व्यवस्था दुरुस्त होण्यापलीकडे बिघडून जाईल. डिजिटायजेशन म्हणजे मानवतावादी भूमिकेचा ºहास नव्हे, हे आपण सतत लक्षात ठेवायला हवे. डिजिटायजेशनमध्ये सरकार आणि जनता यांचा सारखाच सहभाग असायला हवा. मानवी घटकांचा विचार न करता केलेले डिजिटायजेशन अयशस्वी ठरण्याचा धोका आहे, हे वेळीच ध्यानात घ्यायला हवे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानdigitalडिजिटल