शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

विकास मंडळांचा खुळखुळा तरी हाती होता; अजितदादांनी तोही पळवला

By सुधीर महाजन | Published: March 03, 2021 8:10 AM

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला

बारामती म्हणजे केवळ बारामती नाही तर अनेकांची मती गुंग करण्याचा गुणधर्म या मातीचा आहे. म्हणूनच विधानसभेत अजितदादा पवारांनी केवळ खुळखुळ्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची शक्कल लढवली नसती. हा खुळखुळा कधी काळी आपल्या पश्चात शस्त्र बनू शकतो, असा अंधूक अंदाज गोविंदभाई श्राॅफ यांना आला असता तर पार दिल्लीपर्यंत खस्ता खात शंकरराव चव्हाणांसारख्या जुन्या सहकाऱ्याचा विरोध सहन करत मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळ मंजूर करून आणले नसते. त्यांना काय माहीत हे विकास मंडळ म्हणजे वेताळाने विक्रमास दिलेला वर असेल की, जो पुढे जाऊन त्याच्यावरच उलटतो. तर, ३७१ (२) कलमान्वये मागास भागाच्या विकासासाठी मराठवाड्यासोबत विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली आणि पुढे राजकारणात जे होते तेच झाले.  कालांतराने याचा राजकीय  मंडळींनी खुळखुळाच करून टाकला आणि रिकामटेकड्यांची सोय लावण्याची ती हक्काची जागा बनली. गोविंदभाई गेले आणि नंतर काही वर्षांत विकास मंडळाचा खुळखुळाच झाला. त्याचा विसरही पडला.

परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला. सरकारने सुचवलेल्या राज्यपालांच्या अधिकारातील विधान परिषदेवरील १२ जणांची नियुक्ती राज्यपाल करत नाही तोपर्यंत या विकास मंडळावरील नियुक्त्या सरकार करणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. तू आम्हाला पेपरमिंटची गोळी देत नाही तर आम्ही तुला होमवर्कची वही देणार नाही. इयत्ता ५ वीत असताना आम्ही केलेली प्रतिज्ञा आठवली. त्यावेळी याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात, एवढे आम्ही जाणते नव्हतो.

ज्या आवेशाने दादांनी सभागृह गदागदा हादरवून टाकले त्यावेळी ‘मेरी झांशी नही दुंगी’ असे म्हणणाऱ्या चित्रपटातील कंगनाचा आवेश डोळ्यांसमोर तरळून गेेला. कंगना म्हणताच ऊर्मिला आठवली. या दोघींमधून विस्तव जात नाही. हे दादांना माहीत असावे म्हणून दादा १२ जागांच्या नियुक्त्यांचा आग्रह तर धरत नसावे, असेही क्षणभर वाटले; पण हा विचार झटकला तसा आम्हास मराठी बाणा आठवला.

वैधानिक विकास मंडळाचा खुळखुळा केल्याबद्दल  आम्हा मराठवाड्यातील लोकांची अजिबात नाराजी नाही. ते मिळेल यातच आम्ही भरून पावलो होतो. काहीही मिळाले की, आम्हाला तृप्तीची ढेकर येते आणि डोळे आपोआप मिटले जातात, असेच आम्ही यशाच्या गुंगीत असताना विकास मंडळाचा खुळखुळा केव्हा झाला हेच आम्हाला समजले नाही. अगदी परवा परवा देवेंद्र भाऊंनी मराठवाड्यासाठी ‘वाॅटरग्रीड’ची घोषणा केली आणि बसल्या बसल्या डोळे मिटत पाण्यात डुंबायला लागले. कधी काळी नितीन गडकरींनी केलेली गोदावरीतून जलवाहतुकीची  घोषणाही मिटत्या डोळ्यांवरून तरळून गेली; पण या डुलकीने घात केला आणि आमचे आयआयएम फडणवीसांनी नागपूरला पळवून नेले. आमचे रस्ते, आमच्या रेल्वेगाड्या, आमच्याकडे येणारे कारखाने पळवले जातात. तिकडे अहमदनगर, नाशिककर दिवसाढवळ्या आमचे पाणी पळवतात. यावर्षी तर कमालच झाली तुमच्याकडे पाऊस जास्त झाल्याने आम्ही पाणी सोडणार नाही, अशी घोषणाच नाशिककरांनी केली. पूर्वी म्हणे दरोडेखोर जाहीरपणे घरावर चिठ्ठी चिकटवून पूर्व सूचना देऊन दरोडा टाकायचे, तशी ही नाशिककरांनी काढलेली खोडी. आता हा विकास मंडळांचा खुळखुळा तरी आमच्या हाती होता, म्हटले याचा कोणास काय उपयोग हा तरी कोण पळवणार नाही; पण अजितदादांनी तोही पळवला. पाहू आता किती वाजवता ते?-सुधीर महाजन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादAjit Pawarअजित पवार