विलंबास सर्वच जण कारणीभूत
By Admin | Updated: December 13, 2014 23:29 IST2014-12-13T23:29:11+5:302014-12-13T23:29:11+5:30
न्यालयीन कामकाजाला विलंब होतो, अशी ओरड नेहमीच होत़े मात्र अशी ओरड करणारेही या विलंबास तेवढेच जबाबदार असतात़

विलंबास सर्वच जण कारणीभूत
न्यालयीन कामकाजाला विलंब होतो, अशी ओरड नेहमीच होत़े मात्र अशी ओरड करणारेही या विलंबास तेवढेच जबाबदार असतात़ कारण न्यायालयाची चौकट पक्षकार, वकील, न्यायाधीश व स्वत: न्यायालये यावर आधारित आह़े यांची सूत्रे एकमेकांशी जुळत नाहीत, तोर्पयत यावर ठोस तोडगा निघणो कठीणच आह़े तेव्हा विलंबावर बोट ठेवणा:या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून या गंभीर समस्येचा विचार करायला हवा़
न्यायालयात खटले का दाखल होतात, त्याच्यामागची नेमकी कारणो काय असतात, हे आपण सर्वानीच मुळातून जाणून घ्यायाला हव़े सारासार विचार करता खटल्यांचे मूळ कारण हे आपापसातील वादच असत़े अमुक एक गोष्ट पटली नाही की न्यायालयाचे दार ठोठावले जात़े असे खटले दाखल होण्याची संख्या वाढल्यानंतर आपसूकच तुंबत चाललेल्या खटल्यांची संख्या वाढतच जाणाऱ याला जसा बदलता काळ जबाबदार आहे, तशी लोकांची मानसिकताही तेवढची कारणीभूत आह़े म्हणूनच खटले दाखल होण्याचे प्रमाण कसे कमी होईल, यावर प्रथम लक्ष केंद्रित करून त्या दिशेने ठोस उपाययोजनांची आखणी करायला हवी़
या प्रयत्नाची सुरुवात प्रामुख्याने कुटुंबांची मानसिकता बदलण्यापासून करायला हवी़ वादाचा स्त्रोत हा कुटुंबातूनच सुरू होतो़ कुटुंबातील व्यक्तीच समाजाचा चेहरा असतो़ या चेह:याला न्यायदानाची प्रक्रिया व वादावरील तोडगा यातील फरक समजावून सांगितल्यास कायद्याच्या चौकटीत राहून वाद मिटण्याचे प्रमाण नक्कीच वाढू शकत़े
खटले तुंबण्याचे अजून एक कारण असे, की पक्षकारांच्या खटला रोखण्यासाठीच्या चाललेल्या युक्त्या हे आह़े अनेकदा पक्षकार वेगवेगळी कारणो पुढे करून खटल्याची लगाम सैल करतो़ त्याच्यावर ठोस तोडगा म्हणजे विलंबाचा फायदा शोधणा:या पक्षकारांवर कडक उपाय केले पाहिजेत़ असे केल्याने किरकोळ मुद्दय़ांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणा:यांना अटकाव बसेल़ हे करताना न्यायाधीश व वकिलांनाही खटले तत्काळ निकाली काढण्याचे प्रशिक्षण देणो आवश्यक आह़े याने वकील व न्यायाधीश यांच्यातील सुसंवाद वाढेल़ वकिलानेही पक्षकाराला न्यायालयाची पायरी चढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करावा व सामोपचाराने संबंधित प्रकरणावर तोडगा काढण्याचा सल्ला द्यावा़ असे केल्याने न्यायालयाचा वाढता ताण कमी होईल़ सरकारनेही न्यायालयांना योग्य त्या पायाभूत सुविधा देणो गरजेचे आह़े बरेचदा पायाभूत सुविधांच्या अभावी न्यायालयांना नीट काम करता येत नाही़ त्यामुळे न्यायालयांना नेमके काय हवे आहे, याचा विचार शासनाने करायला हवा़
महत्त्वाचे म्हणजे न्यायालयांनीही अनावश्यक मुद्दय़ांवर टीका-टिप्पणी करणो टाळायला हव़े यामुळे न्यायालयाची प्रतिमा आणखी पारदर्शक होईल़
35 वर्षाच्या माङया वकिली कारकिर्दीत अनेक अनुभव मला आल़े मी वकिली सुरू केली, तेव्हा दररोज उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत होती़ काही वर्षापूर्वी हे सर्व बंद झाल़े मात्र आता आठवडय़ातून एकदा तरी अंतिम सुनावणी घेतली जात़े याचे प्रमाण हळूहळू वाढायला हव़े यानेही खटल्यांच्या निपटारा लवकर होईल़
ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे