शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

संगणकाला अक्कल आली, ‘नैतिकता’ शिकवण्याचा पेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 08:44 IST

मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अशा अति-प्रगत तंत्रज्ञानांवर नैतिकतेचे रोपण कसे करता येणार?

डॉ. दीपक शिकारपूरउद्योजक, संगणक साक्षरता प्रसारक

मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग अशा अति-प्रगत तंत्रज्ञानांवर नैतिकतेचे रोपण कसे करता येणार?

१९७० च्या दशकात संगणकाचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू झाला आणि गेल्या पाच वर्षांत त्यांचे स्वरूप कसे आमूलाग्र बदलले हे वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही. १९७० मधल्या महासंगणकापेक्षाही जास्त वेगवान, कार्यक्षम आणि बहुआयामी रचनेची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आज अगदी स्वस्तातल्या मोबाइल फोनमध्येही आढळते. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल, किंबहुना तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे. ह्याला ‘इंटेलिजंट कॉम्प्युटिंग’ असे म्हटले जाते..संगणकाला ‘विचारक्षमता’ नसते असे मानणाऱ्यांचाही गट मोठा आहे. कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. - पण मागील काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांनी नैतिक तंत्रज्ञान हा मुद्दा चर्चेत आला आहे. एखादी  अनैतिक बाब कदाचित कायदेशीरही असू शकते. तसेच एका सामाजिक गटाला नैतिक वाटणारी बाब दुसऱ्या गटाला अनैतिक वाटू शकते. शेवटी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की तंत्रज्ञान सुरीसारखे असते. एखादे फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याचा खून करण्यासाठी; तंत्राला वापरणारे मन, विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेत अनेक वेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुणातरी विकृत व्यक्तीने केले, पण भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल. त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. आपण एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम कोडला पॅच करून कार्यशील करू शकतो, पण प्रोग्रामरच्या मनाला कसे पॅच करणार? माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली.या पार्श्वभूमीवर आता विकसित देशातील विचारवंत चिंतीत झाले आहेत. आगामी काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या  तंत्रज्ञानामुळे  जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध व नवीन उत्पादने बनू शकतील व बनतीलही. मशीन लर्निंग, नॅचरल लॅँग्वेज प्रोसेसिंग ऊर्फ एनएलपी आणि कॉग्निटिव्ह कॉॅम्प्युटिंग या तीन अतिशय प्रगत तंत्रज्ञानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोलारा उभा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय प्रणालीला माणसाप्रमाणे विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हा उद्देश यामागे आहे, पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह  विकृत वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठांत नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञांना व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मलमुळे अनेक व्यक्ती डिजिटल तंत्रज्ञान वापरू लागल्या व अनेकांनी व्याप्ती वाढवली. यात ई-मेल, सोशल मीडिया, ई-व्यापार, ऑनलाइन व्यवहार यांचा समावेश होतो. यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक माहिती अनेक उद्योगांच्या हाती लागली आहे. या माहितीचा गैरवापर होताना आढळतो. याबाबतीत प्रचलित कायदे फारसे प्रभावी नाहीत. इथेच नैतिकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. व्यवसायाचा हेतू फक्त लाभ असाच असता कामा नये, हे बाळकडू शालेय शिक्षण पद्धतीत, व्यवस्थापन उच्च शिक्षणात अंतर्भूत केलेच पाहिजे. यामुळे संगणक शास्त्रात आता एथिकल कॉम्प्युटिंग ही शाखा उदयास आली आहे. याचा अंतर्भाव सर्व माहिती तंत्रज्ञान शिक्षण संस्थानी ताबडतोब करावयास हवा. तसेच प्रचलित संगणक उद्योगांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे शिक्षण स्वखर्चाने द्यायला हवे. यामुळे कदाचित भविष्यातील सायबर गुन्हे टळू शकतील. आपल्या देशाला उच्च आध्यात्मिक  परंपरा आहे. या क्षेत्रात आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो.deepak@deepakshikarpur.com

टॅग्स :Internetइंटरनेट