शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील विद्याथ्र्याना मिळणार उपग्रहाद्वारे शिक्षण

By admin | Updated: May 9, 2017 00:36 IST

विद्यापीठाकडून लवकरच सॅटेलाईट सेंटर : बडय़ा महाविद्यालयांकडून मागविले प्रस्ताव

जळगाव : नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यार्थी हितावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यानुसार विद्याथ्र्याना दर्जेदार व कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळावे यासाठी भर दिला जात आहे. उमवि परिक्षेत्रातील बडय़ा महाविद्यालयांमध्ये विविध विषय शिकविले जातात, मात्र ते विषय इतर महाविद्यालयांमध्ये शिकविले जात नाही. त्यामुळे त्या विषयाची माहिती किंवा शिक्षण इतर महाविद्यालयातील विद्याथ्र्याना मिळावे यासाठी उमविकडून सॅटेलाईट सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार खान्देशातील  कोणत्याही महाविद्यालयातील शिक्षक आपल्या महाविद्यालयातूनच उमवि परिक्षेत्रात येणा:या कोणत्याही महाविद्यालयातील विद्याथ्र्याना शिक्षण देऊ शकणार आहेत. यासाठी उमविकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. नवीन   विद्यापीठ कायद्यातही सॅटेलाईट     सेंटर सुरू करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार उमविकडून आपल्या क्षेत्रात      येणा:या काही बडय़ा महाविद्यालयांना उपग्रह सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या   आहेत. ऑगस्टर्पयत हे प्रस्ताव स्वीकारले जाणार असल्याची    माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिळणार शिक्षणउमवि क्षेत्रातील मू.जे. महाविद्यालय, पु.ओं. नाहाटा महाविद्यालय अशा महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विषय शिकविले जातात. काही लहान संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये विषय शिक्षकांची कमतरता, अनुदान न मिळणे किंवा विद्यार्थी संख्या कमी असणे अशा कारणांमुळे ठरावीक विषय शिकविले जातात. यामुळे विद्याथ्र्याना आवडीच्या विषयासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यामुळे चोपडा, यावल किंवा शहादा या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जरी संबंधित विषय शिकविणारे शिक्षक नसले तरी त्या महाविद्यालयात उपग्रहाद्वारे ज्या महाविद्यालयात संबंधित विषय शिकविणारे शिक्षक आहेत, त्या महाविद्यालयातून हे विषय शिकविले जाणार आहेत. मू.जे.महाविद्यालय किंवा नाहाटा, प्रताप महाविद्यालय अशा महाविद्यालयातील शिक्षक आपापल्या महाविद्यालयातून व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे शिक्षण देऊ शकणार आहेत. या महाविद्यालयांकडून मागविले प्रस्तावविद्यापीठाने उमवि परिक्षेत्रातील काही बडय़ा महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले आहे. यामध्ये मू.जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, पु.ओं. नाहाटा महाविद्यालय भुसावळ, प्रताप महाविद्यालय चोपडा, ङोड.बी.पाटील महाविद्यालय धुळे, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय धुळे, जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक महाविद्यालय शहादा या महाविद्यालयांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यापीठाकडून कला अकॅडमी, स्पोर्ट्स अकॅडमी, कौशल्य विकासअंतर्गत येणा:या कोर्सेससाठीदेखील महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. उमविच्या नंदुरबार येथील ट्रायबल अकॅडमी, स्पोर्ट्स अॅकडमी व एकलव्य केंद्रांतर्गत कला अकॅडमी सुरूकरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच संलगिAत महाविद्यालयांनी बी.व्होक कोर्सेस सुरूकरण्याबाबतचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करण्याचा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.