शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चराति चरतो भग:

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:10 IST

शरदरावांच्या रक्तातच चुंबकाचे गुण असावेत, असं वाटतं. याचं कारण शिक्षण, कला, साहित्य, अधिवेशन अशा समारंभांना त्यांच्या चाहत्यांनाच नव्हे, तर विरोधकांनाही शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून असावेत, असं वाटतं. असं चुंबकीय व्यक्तिमत्त्व फार थोड्यांना मिळतं.

- शां. ब. मुजुमदार(संस्थापक व अध्यक्ष, सिंबॉयसिस) यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्राने जर कुणाचं नेतृत्व निर्विवादपणे मान्य केलं असेल, तर ते शरद पवार यांचं. यशवंतरावांचा वैचारिक वारसा त्यांनी घेतलाच, पण त्याचबरोबर त्यांचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व इतकं बहुआयामी आहे की, त्यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा व्यासंग, त्यांची अभ्यासू वृत्ती, महाराष्ट्राच्या समस्यांची आणि त्याचबरोबर आधुनिक राहणी, विचारप्रवाह यांचीही सखोल जाण, अखिल भारतीय पातळीवरही स्वत:ची छाप पाडण्याजोगं कर्तृत्व आणि समाजाच्या विविध स्तरावरील व्यक्तीमध्ये-प्राध्यापक, लेखक, कलाकार, खेळाडू, शेतकरी, राजकीय कार्यकर्ते आणि सामान्यातला सामान्य माणूस यांच्यात सहजतेने वावरण्याचं विलक्षण संभाषण कौशल्य इत्यादी गुणामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व उठावदार व प्रभावी झालं आहे. महाराष्ट्रात एकही खेडं असे नसेल की, जिथे शरदराव गेलेले नाहीत. तिथल्या दोन-चार जणांना तरी शरदराव हे पहिल्या नावाने हाक मारतात, मारू शकतात, हे अनेकदा दिसून येतं. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव हटकून येतं.१९९० हे साल डॉ.आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून जाहीर झाले. डॉ. आंबेडकराच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाने जागा दिली, पण त्याला सुरुवातीपासूनच पर्यावरणवादी संस्थेकडून तीव्र विरोध झाला. प्रकरण न्यायालयात गेले आणि शेवटी निकाल सिंबॉयसिसच्या बाजूने लागला. सिंबॉयसिसच्या डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ शरद पवारांच्या हस्ते करावा, असे ठरवले. मी त्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. डॉ.आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना नागपूरची दीक्षान्त भूमी, मुंबईची चैत्यभूमी आणि इतर अनेक संस्थांची आमंत्रणं येणार हे मलाही कळत होतं, त्यामुळेच मी आमंत्रण दिलं, तरीही त्यांना ते स्वीकारणं शक्य होईल का, याविषयी मी साशंक होतो, पण आश्चर्य म्हणजे त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. त्याप्रमाणे ते आले.डॉ.आंबेडकर स्मारकाच्या जागेवरून निर्माण झालेले वादंग, त्याला करण्यात आलेला तीव्र विरोध आणि शेवटी सिंबॉयसिसला द्यावा लागलेला न्यायालयीन लढा याची त्यांना कल्पना होती. आपल्या भाषणांत त्यांनी याचा मुद्दाम उल्लेख केला आणि या सर्व विरोधाला, संघर्षाला मी तोंड देत उभा राहिलो, माघार घेतली नाही, याबद्दल माझे कौतुकही केले. याचवेळेस त्यांनी डॉ.आंबेडकर स्मारकासाठी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.शरद पवारांचे झंजावाती दौरे हा एक कुतूहलाचा व कौतुकाचा विषय आहे. चराति चरतो भग: ही उक्ती शरदरावांच्या बाबतीत अक्षरश: खरी आहे. लातूरचा भूकंप, बाबरी पाडल्यानंतर मुंबईत झालेली दंगल. कोल्हापूर-सांगलीमध्ये पुराने केलेला विध्वंस, मराठवाड्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या आणि अशा आपत्तीच्या वेळी स्वत:च्या प्रकृतीची फिकीर न करता, शरदराव सतत मोटारीने, हेलीकॉप्टरने फिरत राहिले. शरीरात उद्भवलेला कर्करोग असो वा पायाला झालेला अपघात असो, त्याची पर्वा न करता विधवांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी, शेतकऱ्यांना धीर देण्याकरिता, पावसाची तमा न बाळगता भरपावसात निवडणुकीचा प्रचार हा माणूस कसा करू शकतो, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. मीही अचंबित होतो, पण शरदरावांची दुर्दम्य इच्छाशक्ती हेच याचं उत्तर आहे. केवळ यामुळेच शरदरावांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माझ्याबाबतीत एक सुखद योगायोग जुळून आला आहे. पुणे महापालिकेने केलेला माझा सत्कार, ७५ व ८०व्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केलेला सत्कार, पद्मश्री व पद्माभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर माझे झालेले सत्कार अशा प्रत्येक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. त्यांनी केलेल्या कौतुकाचा ठेवा माझ्या अजन्म लक्षात राहील.शरदराव आज वयाची ८० वर्षे पूर्ण करून सहस्त्र चंद्रदर्शनात प्रवेश करत आहेत. या प्रसंगी मी त्यांच्यापेक्षा केवळ वयाने मोठा असल्यामुळे त्यांना मनापासून शुभेच्छा व आशीर्वाद देतो. जिवेत् शरद: शतम् ॥

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण