शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रगल्भ कर्णधार...

By admin | Updated: February 15, 2017 00:28 IST

कर्णधार म्हणून विराट कोहली प्रत्येक सामन्यागणिक प्रगल्भ होत आहे, असे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कानावर पडत आहे.

कर्णधार म्हणून विराट कोहली प्रत्येक सामन्यागणिक प्रगल्भ होत आहे, असे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कानावर पडत आहे. परंतु, नेमकं प्रगल्भता कशाप्रकारे आपल्यात आली, याचे उत्तम उदाहरण कोहली नुकताच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातून सिद्ध केले. निर्णायक क्षणी अचूक डीआरएस पर्यायाचा वापर करून कोहलीने कल्पक नेतृत्वाची छाप पाडली. विशेष म्हणजे याच अचूक निर्णयाच्या जोरावर त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केले. त्याचवेळी, आपल्या खेळाडूंवर असलेला विश्वास त्याला उत्कृष्ट कर्णधार बनवत आहे. प्रत्येक डीआरएस घेण्यापूर्वी कोहली आपल्या खेळाडूंचा विश्वास जाणून घेत त्यांच्यानुसार निर्णय घेतो आणि यामुळेच संघ खऱ्या अर्थाने ‘टीम इंडिया’ बनते.बांगलादेशविरुद्ध बाजी मारत कोहलीने कर्णधार म्हणून १५ कसोटी सामने जिंकताना यशस्वी भारतीय कर्णधारांमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याच्यापुढे आता सौरभ गांगुली (२१) आणि महेंद्रसिंग धोनी (२७) यांचा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा सलग १८ कसोटींत अपराजित राहण्याचा विक्रमही मोडताना कोहलीने १९ कसोटींमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी केली. कर्णधार म्हणून प्रत्येक मालिकेमध्ये तो नवा विक्रमा रचत असला तरी, कोहलीच्या नेतृत्वाची खरी परीक्षा अद्याप बाकी आहे.कोहलीमध्ये कर्णधारासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत; मात्र अद्याप त्याची ‘विराट’ परीक्षा झालेली नाही. त्याच्यामध्ये विजयाची भूक प्रचंड असून, त्याचा जोश जबरदस्त आहे. घरच्या मैदानाबरोबरच परदेशामध्येही जिंकण्याची त्याची क्षमता आहे. श्रीलंकेला त्यांच्या देशात लोळवल्यानंतर वेस्ट इंडिजलाही त्यांच्याच भूमीत धक्का दिला. मात्र, असे असले तरी आॅस्टे्रलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा तीन ‘पॉवर हाउस’वर कब्जा करण्याचे आव्हान कोहलीपुढे असेल. त्यातच, आॅस्टे्रलियन संघ भारत दौऱ्यावर येत असून, या मालिकेवरही बरेच गणित अवलंबून असेल. एकूणच, आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी कायम सज्ज असलेला कोहली आपली कठीण परीक्षाही यशस्वीपणे पार पाडेल अशी खात्री आहे. त्याला मिळालेल्या यशाची भुरळ पडू नये हीच अपेक्षा...