काँग्रेससमोर आव्हान मोठे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:20 AM2019-01-01T01:20:06+5:302019-01-01T01:23:34+5:30

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये काँग्रेस आजही सक्षम दिसत नाही.

 Biggest challenge for Congress | काँग्रेससमोर आव्हान मोठे!

काँग्रेससमोर आव्हान मोठे!

Next

- शीलेश शर्मा

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये काँग्रेस आजही सक्षम दिसत नाही. परिणामी, राहुल गांधी एकटेच संघर्ष करत आहेत आणि जी टीम त्यांच्यासोबत आहे, त्यांचे राज्य स्तरावर मोठे वर्चस्व नाही. याची उणीव २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान बनू शकते.

येणारे नवीन वर्ष जसे भाजपासाठी सत्ता राखण्यासाठी धडपड करणारे असेल, तसेच काँग्रेससाठी ते केंद्रात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठीच्या आव्हानाचे वर्ष असेल. अनेक पक्षांची मोट बांधून मोदी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. मात्र, आता या पक्षाला खरी गरज ही संघटन मजबूत करण्याची. मोदींना पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसला आधीपेक्षा दुप्पट ताकदीने उभे राहावे लागणार आहे आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर हे मोठे आव्हान असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी टिष्ट्वट करून पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला केला आहे. ते म्हणाले की, ‘चौकीदाराचा वेश, चोरांचे काम. बँकांचे ४१,१६७ कोटी रुपये जिगरी दोस्ताच्या नावे सोपविले. एवढ्या रकमेत मनरेगा पूर्ण एक वर्ष चालले असते. तीन राज्यांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते, ४० एम्स उघडता आले असते.’

राहुल गांधी हे एकटेच मोदींवर निशाणा साधत आहेत, तर राहुल गांधी यांच्याविरुद्ध मोदी आणि शहा यांच्या जोडीसह पूर्ण भाजपा उभी आहे. राफेल व्यवहारावरून राहुल गांधी हे मोदी यांना ‘चोर’ म्हणत आहेत, तर अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारावरून मायकेलच्या कथित जबाबानंतर ईडीच्या हवाल्यावरून सोनिया आणि राहुल गांधी यांना भाजपा लक्ष्य करत आहे.

उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसला अशी चिंता आहे की, जोपर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांची प्रतिमा तोडली जात नाही, तोपर्यंत मोदी यांना आव्हान देणे अवघड काम असेल. काँग्रेसच्या तमाम बड्या नेत्यांना असे वाटते की, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतरही काँग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्टीने मजबूत झाला नाही. अशा परिस्थितीत २०१९च्या निवडणुकीत पक्ष कशा प्रकारे मुकाबला करेल? तीन राज्यांत निवडणुका जिंकल्याने लोकसभा निवडणूक सहज जिंकता येणार नाही.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, पक्षात सर्वाधिक कमतरता व्यवस्थापकांची आहे. त्यामुळे आघाडी शक्य असलेल्या राज्यात आघाडी होऊ शकत नाहीये. व्यवस्थापन टीममध्ये राहुल गांधी यांच्याकडे अतिशय अनुभवी अशा नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल हे नेते आहेत. कमलनाथ, अशोक गहलोत हे नेते मध्य प्रदेश, राजस्थानात आपआपल्या सरकारमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा अभाव केंद्रीय स्तरावरील काँग्रेस नेतृत्वाला जाणवत आहे.

पक्षाच्या नेत्यांचे असेही म्हणणे आहे की, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही राहुल गांधी आतापर्यंत विविध राज्यांत जिल्हा आणि प्रदेशस्तरावर अध्यक्षांची नियुक्ती करू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सक्षमपणे उभा राहू शकत नाही. हीच परिस्थिती पक्षाच्या सर्वोच्च अशा काँग्रेस कार्यसमितीची आहे. येथे विविध राज्यांचे ना केवळ प्रतिनिधित्व आहे ना बडे नेते यात समाविष्ट आहेत.
थेट तळागाळात काम करणाºया मोठ्या नेत्यांची नावे कार्यसमितीतून गायब आहेत. हरियाणात भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला लोक कंटाळले आहेत. काँग्रेसकडे आशेने पाहत आहेत. तिथे काँग्रेस पक्ष जिल्हा स्तरावरून ते प्रदेश स्तरापर्यंत आतापर्यंत कोणतेही संघटना उभा करू शकलेला नाही.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये काँग्रेस आजही सक्षम दिसत नाही. परिणामी, राहुल गांधी एकटेच संघर्ष करत आहेत आणि जी टीम त्यांच्यासोबत आहे, त्यांचे राज्य स्तरावर मोठे वर्चस्व नाही. याची उणीव २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान बनू शकते.

Web Title:  Biggest challenge for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.