शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग

By सुधीर महाजन | Published: August 08, 2019 6:51 PM

दोन्ही उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांची पंचाईत केली.

- सुधीर महाजन

भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी आणि अंबादास दानवे या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनी स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणूक लढविण्याचे पत्रक जाहीर करून मतांचे दलाल आणि मतदार यांचीच पंचाईत केली. पंगतीत आशेने बसलेल्यांच्या पात्रावर वाढायचेच नाही, असा हा प्रकार आहे. खरे तर ‘याचसाठी केला होता अट्टहास’ आणि आता हे यजमानच तोंडचा घास काढत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक घोडेबाजारासाठी प्रसिद्ध; पण या दोघांनीही खोगीर ऐन मोक्याला काढून घेतल्याने आता या निवडणुकीत कोणता रंग भरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीतील घोडेबाजाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. काही नेते आपल्याकडील ‘गठ्ठा’ मतांची बोली वाढवत होते. त्यावेळी या दोघांनी अवसानघात केला. 

औरंगाबाद- जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत सध्या तरी शिवसेना-भाजप यांच्यातच कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी हे पक्षासाठी एकनिष्ठ असलेले. अंबड नगरपालिकेच्या राजकारणातील सक्रिय, तर शिवसेनेचे अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख अगदी खासदारकीपासून ते आमदारकीपर्यंत सगळ्याच पदांसाठी दावा सांगणारे. अर्जुन खोतकरांना बाजूला सारून त्यांना सेनेने उमेदवारी दिली ती पक्षनिष्ठा या गुणांवर. नसता या उमेदवारीसाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार होते. ६५७ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार केला, तर भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १६९, राष्ट्रवादी ८७, एमआयएम २८, अपक्ष ४५, अशी स्थिती असताना सेना-भाजप युती म्हणून दानवेंसाठी ही निवडणूक वरकरणी सोपी दिसते; पण या दोन पक्षांतील रुसव्या-फुगव्यांचे राजकारण कोणते वळण घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेस सोबत, तर जालना जि.प.मध्ये राष्ट्रवादीशी गाठ बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबादमधील काँग्रेसशी नाते तोडा, या मुद्यावर भाजप अडून बसली. त्यामुळे दानवे वेगळी मोट बांधण्याच्या प्रयत्नात दिसतात. आ. अब्दुल सत्तार यांनी काँगे्रस पक्ष सोडला असला तरी किमान ५० मते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे काल दानवे सत्तार यांची भेट झाली. सत्तार सध्या भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. २० आॅगस्ट रोजी भाजपची महाजनादेश यात्रा सिल्लोडला येणार असल्याने त्याच मुहूर्तावर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे घडले तर ते आपले वजन भाजपकडेच टाकतील.

इकडे कॉंग्रेसचे बाबूराव कुलकर्णीसुद्धा जमवाजमवीत मागे नाहीत. एमआयएम, अपक्षांकडे त्यांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच ही उमेदवारी मिळाल्याने गणित बदलू शकते. १९९९ साली अब्दुल सत्तार, २००७ साली भाजपचे किशन तनवाणी, तर २०१३ साली काँग्रेसचे सुभाष झांबड यापूर्वी विजयी झाले होते. पक्षनिहाय बलाबलाचा विचार केला, तर वर म्हटल्याप्रमाणे समीकरण मांडले जाऊ शकते; परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा ही अतिशय दुय्यम आहे. त्यापेक्षा ‘लक्ष्मीनिष्ठा’ नेहमीच प्रभावी ठरते. कारण नगरसेवक, जि.प. सदस्य, अशा मतदारांच्या अल्पायुषी राजकीय कारकीर्दीत अना मणिकांचन योग दुर्लभ येतो. त्यामुळे हा योग साधण्याची सगळ्यांची घाई असते. काही नेत्यांकडे आपले निष्ठावान मतदार असतात. त्यासाठी नेत्यांसमवेत मांडवली करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत खर्चावर बंधन नसल्याने घोडेबाजार तेजीत असतो. शिवाय प्रवास, देवदर्शन, रिसॉर्टमधील ऐशोआराम, असाही अतिरिक्त लाभ मतदारांच्या पदरात अलगद पडतो. गेल्या निवडणुकीत दिलेली ‘लक्ष्मी’ पावली की नाही, याची पडताळणी घेण्यासाठी एका उमेदवाराने आपल्या मतदारांना कॅमेरा असलेले पेन मतदानासाठी दिले होते. हा एक वादाचा मुद्दा घडला होता. आता तंत्रज्ञानाचाही वेगाने विकास झाला आहे. त्यामुळे उमेदवार मत पदरात पाडून घेण्यासाठी काय क्लृप्त्या लढवतात, ही माहिती रंजक असेल. सेना-भाजप युतीचे तळयात-मळ्यात असल्याने बाबूराव कुलकर्णी काय चमत्कार दाखवतात, हे पाहावे लागेल. नाही तरी म्हाताऱ्याला संधी हवीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक