शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
3
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
4
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
5
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
6
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
7
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
8
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
9
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
10
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
11
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
12
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
13
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
14
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
15
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
16
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
17
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
19
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
20
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

लेख: २३ महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या सावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:07 IST

कथा कुणाच्या सांगाव्यात?  खरं तर सर्वांच्याच सांगाव्यात. तटस्थपणे. न गुंतता. आपण आपल्या जडणघडणीनुसार कुणाच्या कथा सांगाव्यात हे निवडत असतो...

अक्षय शिंपी,कथा कुणाच्या सांगाव्यात?  खरं तर सर्वांच्याच सांगाव्यात. तटस्थपणे. न गुंतता. आपण आपल्या जडणघडणीनुसार कुणाच्या कथा सांगाव्यात हे निवडत असतो. सुरुवातीला नकळत आणि पुढे-पुढे जाणीवपूर्वकही. कथांनी आजवर ज्यांना ‘ब्र’ही उच्चारता आला नाही, अशांचा आवाज व्हावं. दबलेल्या, दडपून टाकलेल्यांचा आक्रोश उजेडात आणावा. किमान माझा कल तरी अशा कथांकडे आहे.  म्हणूनच अंधारे कोपरे उजेडात आणणारं वाङ्मय मला खेचून घेतं, हाका मारून बोलावतं. असो.

पुरुषी वर्चस्वांच्या अनेक क्षेत्रांत स्त्रियांनीही आपल्या कर्तृत्वानं स्वतंत्र ठसा कायमच उमटवलेला दिसतो. सावित्रीबाई फुले यांनी आपलं बळ या देशातील स्त्रियांमध्ये पेरलं आणि आजवर बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया आपापला आवाज लावून आपल्या कथा स्वत: सांगू लागल्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देऊन फुले दाम्पत्यानं देशोद्धारात मोठं योगदान दिलं.

आजवर ज्या स्त्रियांना ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारला गेला होता, त्या आता ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दुवा झाल्या. केवळ अन् केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या पुस्तक प्रकाशनसंस्थेच्या चालक-मालक, सर्वेसर्वा झाल्या. ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ हे डॉ. प्रवीण घोडेस्वारलिखित पुस्तक भारतभरातील प्रकाशन संस्थांशी संबंधित असणाऱ्या २३ महिलांची यशोगाथा सांगतं. मूळ वृत्तपत्रातील स्तंभानं आता पुस्तकरूप घेतलं आहे. 

जोहान गुटेनबर्ग याला मुद्रणकलेचा जनक मानलं जातं. त्याच्या वंशातील आणि फुले दाम्पत्याकडून ज्ञानाचा वसा अन् ध्यास घेतलेल्या, विविध वयोगटांतील, प्रांतांतील, भाषांतील स्त्रिया ज्ञानाच्या क्षेत्रात पाय रोवून कशा उभ्या आहेत, याबद्दलचं विवेचन या पुस्तकात आहे. अतिशय नेमक्या भाषेत त्यांची ओळख अन् कार्याचा आढावा या पुस्तकात येतो. अशा प्रकारचं दस्तऐवजीकरण मराठीत होणं, ही आवश्यक गोष्ट होती, जी या पुस्तकामुळे काही प्रमाणात पूर्ण होते. 

या पुस्तकाला वंदना महाजनांनी लिहिलेली प्रस्तावना माहितीपूर्ण आहे. स्तंभाचं पुस्तकरूप करताना हे लेख भर घालून वाढवणं आवश्यक वाटलं. पुढल्या आवृत्तीत ते घडेल, अशी आशा बाळगता येईल. तरीही या पुस्तकामुळे प्रकाशनविश्वातल्या स्त्रियांची आवश्यक असणारी नोंद वाचकांपुढे येते, हे देखील पुरेसं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shadows: A Saga of 23 Women's Success in Publishing

Web Summary : Dr. Ghodeswar's book, 'Gutenberg's Shadows,' chronicles the success stories of 23 Indian women in publishing. Inspired by Savitribai Phule, these women have established themselves in a male-dominated field. The book, originating as a newspaper column, documents their contributions, fulfilling a vital need in Marathi literature.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीWomenमहिला