शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:34 IST

विरोधी पक्षांकडे नेते आहेत; पण त्यांना वजन नाही. घोषणा आहेत; पण त्यात चमक नाही. विरोधकांना ऐक्य हवे आहे; पण व्यक्तिगत झेंड्याखाली. कसे जमेल?

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

लोकशाहीचा डोलारा आवाज करत कोसळत नसतो. तिला आव्हान देणारे लढायचे कसे ते विसरतात तेव्हा ती आवाज न करता ऱ्हास  पावते. बिहारचा निकाल हा इंडिया आघाडीला सणसणीत चपराक लगावणारा होता. बलाढ्य भाजपचा सामना करू शकेल असा सक्षम विरोधी पक्ष भारतात सध्या उरलेला नाही. ही पोकळी भयावहरीत्या वाढते आहे.  एकेकाळी पत्रकार परिषदा  आणि समाजमाध्यमातून आरडाओरडा पुरेसा नसे. रक्त सांडून, तुरुंगात जाऊन, त्याग करून आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी ध्येय बाळगून सत्ताधाऱ्यांना विरोध केला जात असे.  

इंदिरा गांधी यांच्या सत्तेने कायदेशीर,  राजकीय आणि नैतिक आव्हाने अंगावर घेतली तेव्हा त्या अजेय  भासत असत, तरीही रस्त्यावर उभ्या राहिलेल्या चळवळीने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले. जयप्रकाश नारायण या अशक्त वयोवृद्ध नेत्याला कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. हाती काही नसताना केवळ नैतिक बळावर त्यांनी इतिहास निर्माण केला. समाजवादी, साम्यवादी, पुराणमतवादी असे सारे नेते, शेतकरी संघटना,  कामगार संघटना, विद्यार्थी, आडदांड प्रादेशिक सेनापती या सगळ्यांची मोट बांधून त्यांनी एक राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करणारी शक्तिशाली लाट निर्माण केली. 

याच्या उलट आजचे विरोधी पक्षाचे नेते वागतात. लोकहिताचे  राखणदार होण्याऐवजी खासगी राजकीय उद्योगाचे भागधारक असल्यासारखे बहुतेकांचे वर्तन असते. इंडिया आघाडीतील बहुतेक वाटाघाटी या समोर ठेवलेल्या ध्येयासाठी नव्हे, तर जागांसाठी झाल्या. विरोधकांनी आपापले सवते सुभे वाटून घेतले.   ८० च्या दशकात राजीव गांधींच्या लोकप्रियतेला धडक देत विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बंड केले. देवीलाल, मुलायमसिंह यादव, महामार्ग अडवू शकतील असे शेतकरी, शहरांमधील चौकात रात्रीतून जमतील असे सामाजिक संघटक त्यांच्याबरोबर होते. तामिळनाडूतील एम. करुणानिधी किंवा आंध्रातील एन. टी. रामाराव, बंगालमध्ये ज्योती बसू यांच्या सारख्यांना ‘आमच्याकडे लक्ष द्या’ असे देशाला सांगावे लागले नाही. प्रचंड लोकप्रियतेमुळे मिळालेला जनमानसाचा पाठिंबा आणि देशभर असलेली ओळख यातून त्यांनी हे साधले. त्यांनी त्यांची त्यांची राज्ये  समर्थपणे सांभाळली. गरज वाटली तेव्हा राष्ट्रीय राजकारणाशी हातमिळवणी केली.

आजमितीला भारतीय राजकारणाला नेत्यांच्या दुष्काळाने ग्रासले  आहे. नेते आहेत, पण त्यांना वजन नाही. घोषणा आहेत, पण त्यात चमक नाही. डाव्यांची घसरण झाल्यामुळे वैचारिक मंथन विरळ झाले आहे. एकेकाळी हरियाणा आणि पंजाब गाजवणारे चौताला आणि बादल अंतर्धान पावले आहेत. ममता बॅनर्जी अध्येमध्येच लढायला उतरतात. के. चंद्रशेखर राव फक्त तेलंगणाच्या अस्मितेबद्दल बोलतात. अखिलेश यादव एखाद्या जहागिरीसारखे उत्तर प्रदेशचे रक्षण करू पाहतात; परंतु मोठ्या आघाडीचे नेतृत्व टाळतात. आम आदमी पक्ष स्वतःचा ब्रॅण्ड पक्का करण्याच्या मागे असतो, पण एका छत्रीखाली यायला नकार देतो. प्रत्येक नेत्याला ऐक्य हवे आहे; पण त्याच्या व्यक्तिगत झेंड्याच्या खाली.

या पोकळीत भाजप विनासायास आपला एकछत्री अंमल गाजवतो आहे. अशा प्रकारच्या एकपक्षीय वर्चस्वाचे परिणाम गंभीर आहेत. एक पक्ष वजनदार होतो तेव्हा संस्था झुकतात. नोकरशाही वाकते, तपासी यंत्रणा निवडक लक्ष्ये समोर ठेवतात. माध्यमे सत्तेची भलामण करतात. राजकीय एकाधिकारशाहीत मूठभर लोकांच्या हातात अर्थशक्ती येते. सामाजिक ध्रुवीकरण एक सोयीचे शस्त्र बनते. लोकांना पर्याय दिसतच नाही, तेव्हा ते जबाबदारीची अपेक्षा करणे सोडून देतात. आपणच देशाचे भाग्यविधाते आहोत असे नेत्यांना वाटू लागते. प्रजासत्ताक एकाच पक्षाच्या सुरात सूर मिसळते; एकाच  व्यक्तीचा दृष्टिकोन स्वीकारते. भारताने यापूर्वी असे एकवटणे पाहिले आहे आणि त्याला आव्हानही दिले गेलेले आहे; परंतु निवडणुकीच्या गणिताशी जोडलेल्या आघाड्या असे आव्हान देऊ शकत नाहीत. त्याला नैतिक पाठबळ लागते.  

विरोधी पक्षांना आज पुन्हा उभे राहायचे असेल तर घराणेशाही सोडावी लागेल. कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील. देशाचे प्रश्न हिमतीने पुढे आणणारे नेतृत्व तळागाळातून वर येत असते. दिवाणखाने, घराणेशाहीतून नव्हे! सरकारच्या दमनतंत्राविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची त्यांची तयारी हवी. केवळ टेलिव्हिजनच्या स्टुडिओत बसून बडबड करून चालणार नाही. विकसित आणि सुरक्षित भारताच्या स्वास्थ्यासाठी नवा विचार पुढे आला पाहिजे. तूर्त तरी असा विचार मांडणारा कोणी लेखक दिसत नाही. महत्त्वाकांक्षेच्या वर येऊन कुणी तरी आज निष्ठापूर्वक हे काम करत नाही तोवर विरोधी पक्षांची कहाणी ‘अजापुत्रं बलीं दद्यात’ अशीच राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Empty rhetoric won't defeat BJP; survival coalitions must be abandoned.

Web Summary : Opposition needs strong leadership from grassroots, not dynastic politics. Unity requires shared goals, not just personal ambitions. BJP's dominance threatens institutions, demanding moral opposition beyond election math. New ideas are needed for a healthy India.
टॅग्स :BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी