शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

लेख: राज्यातील पशुपालक ‘पशु-उद्योजक’ होऊ शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:54 IST

पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणीजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे. 

-डॉ. व्यंकटराव घोरपडे (सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली)

केंद्र शासनाच्या आग्रहाने किंबहुना दबावाने व अनेक आंतरराष्ट्रीय  संस्थांच्या अप्रत्यक्ष इशाऱ्याने राज्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अनेक वर्षापासूनची ही मागणी होती. १९८४ मध्येच केंद्र शासनाने हा कायदा पारित केला होता. पण काही अन्य कारणांमुळे व तत्कालीन परिस्थितीमुळे राज्य शासनाने या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करणे टाळले होते. आता आंतरराष्ट्रीय संस्थांचा आग्रह,  पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणीजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून ‘भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४’ अंतर्गत राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्था प्रमुख हे पशुवैद्यकीय पदवीधर राहणार असतील. 

पशुवैद्यकीय पदवीधर  नवनवीन विषयात पारंगत असल्यामुळे पशुपालकांना सर्वंकष मार्गदर्शन मिळेल. चारा पिके, त्यांची लागवड, वापर, महत्त्व पशुपालकांना कळेल. मुरघास, सुकाचारा साठवणूक, अझोला, कृषी क्षेत्रातील ज्यादा उत्पादित कृषी उत्पादनाचा पशुचारा म्हणून कसा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल.

भेसळ आणि कमी गुणवत्तेचे पशुखाद्य उत्पादन या बाबी खूप वाढल्यामुळे पशुपालकांना तोटा सहन करावा लागतो. त्यावर गुणनियंत्रण ठेवणे शक्य होईल. सोबत घरच्या घरी देखील पशुखाद्य तयार  करणे, छोट्या प्रमाणात गाव व गावांचे समूह यासाठी पशुखाद्य कारखाने निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन देखील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मिळेल. 

सध्या राज्यात अल्पशिक्षित मंडळींकडून पशुंची गर्भाशय हाताळणी, अयोग्य पद्धतीने होणारे कृत्रिम रेतन यामुळे पशुवंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. याचे दूरगामी परिणाम होतात. आता ज्यादा किमतीच्या लिंग वर्गीकृत रेतमात्राचा वापर सुरू झाला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञान वापर जनावरांच्या गर्भधारणेसाठी केला जात आहे.  त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय पदवीधर अधिक निश्चित उपयोगी ठरणार आहेत.

सध्या देशात प्राणीजन्य आजार वाढत आहेत. त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे ‘वन हेल्थ’ खाली सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. गावात वैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांच्या सहकाऱ्यांनी अनेक प्राणीजन्य आजारांबाबत जनजागृती, साक्षरता निर्माण करणे शक्य होईल व त्यावर नियंत्रण देखील मिळवणे शक्य होईल. खेडोपाडी आज अनिर्बंधपणे पशू प्रतिजैवकाचा वापर होताना दिसतो. त्यामुळे प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होत आहे. त्यातून निर्माण होणारे रोगजंतू हे एकूणच पशुधनासह मानवी आरोग्य धोक्यात आणत आहेत. 

ते प्रमाण कमी करण्यास योग्य पद्धतीने प्रतिजैविकांचा वापर देखील या माध्यमातून शक्य होईल. एक्स-रे, सोनोग्राफी, पशुरोगनिदान प्रयोगशाळा या माध्यमातून रोगनिदान सोपे झाले आहे. त्यासाठी पदवीधर पशुवैद्यक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निदान व उपचार करू शकतात. त्यातून पशुपालकांचे नुकसान टळू शकेल. राष्ट्रीय पशुधन अभियान, राष्ट्रीय गोकुळ मिशन या माध्यमातून केंद्र सरकार अनुदानाच्या रूपात अनेक योजना आखत आहे. 

त्यामध्ये सहभागासाठी राज्यातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते मिळाल्यास यशस्वी पशु उद्योजक राज्यात निर्माण होतील. ‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचने’च्या या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील सर्व संघटनांनी पशुपालकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेताना जो समंजसपणा दाखवला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. 

फक्त पशुपालकांचे हित आणि राज्याची प्रगती डोळ्यांसमोर ठेवून प्रशासनास सहकार्य करताना सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ हा राहणार आहे. प्रत्येकाने नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त जादाचे काम करून विभागाची घोडदौड ही चालू ठेवणे गरजेचे आहे. या पुनर्रचनेचे यश पशुसंवर्धन विभागाच्या सतर्कतेवरच अवलंबून असणार आहे, हे मात्र नक्की!vyankatrao.ghorpade@gmail.com

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार