शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 07:37 IST

देशामधील एकही संघटना स्वत:ला ‘अर्बन नक्षल’ म्हणवत नाही. मुळात अशी विचारसरणी अस्तित्वातच नाही. ‘अर्बन नक्षल’ ही फक्त एक शिवी आहे.

योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन परवा मला कुणीतरी विचारले, ‘हे अर्बन नक्षल  काय प्रकरण आहे?’  मी म्हणालो, “ते एक भूत आहे. म्हणजे डोळे उघडून नीट पाहिले तर काहीच दिसणार नाही. पण मनात भय  असेल आणि डोळे बंद असतील तर ते सावलीसारखे सतत पछाडत असलेले दिसेल.” 

- यावर भारत जोडो अभियानातील एक तरुण साथीदार म्हणाला, “असे कोड्यात बोलू नका. नक्षलवाद म्हणजे काय आणि अर्बन नक्षल म्हणजे काय, हे जरा आम्हाला समजावून सांगा.”महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान  देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारत जोडो अभियानातील लोकांची विचारधारा आणि कामाची पद्धत अर्बन नक्षलवादी आहे. अर्बन नक्षलवाद म्हणजे लोकांची मने गढूळ करणे, त्यांच्या मनात संशय उत्पन्न करणे.  देशातील विविध संस्था, येथील व्यवस्था याविषयी संशय निर्माण करून देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणे.” नरेंद्र मोदींचा आरोप असा, की काँग्रेस पक्ष अर्बन नक्षली लोकांकडून चालवला जातो. त्यामुळे  माझ्या या तरुण साथीदाराला मी म्हणालो, “नक्षल आणि नक्षलवाद म्हणजे काय हे  मला माहीत आहे. पण अर्बन नक्षल ही संकल्पना समजणे थोडे कठीण आहे. तरीही मी प्रयत्न करतो.”

नक्षलवाद हा भारताच्या डाव्या आंदोलनातील, ६०-७० च्या दशकात जन्मलेला एक उपप्रवाह. त्याचे मूळ स्वरूप आता जवळजवळ नष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात साम्यवादी राजकारणाची मुख्य धुरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष  वाहत होता. परंतु चीनबरोबरच्या युद्धानंतर हा पक्ष फुटला. त्यातील थोडा मवाळ आणि रशिया समर्थक घटक मूळ पक्षात राहिला आणि काहीसा जहाल आणि चीनकडे झुकलेला घटक १९६४ मध्ये पक्षातून फुटून त्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) या नावाने  एक नवा पक्ष स्थापन केला. आपण आज त्याला CPM या नावाने ओळखतो. याच सीपीएममधून फुटून बाहेर पडलेल्या अधिकच जहाल उपप्रवाहाला  नक्षलवादी आंदोलन म्हणून ओळखले जाते. हे आंदोलन उत्तर बंगालमधील नक्षलबाडी नावाच्या एका गावातून सुरू झाले म्हणून त्याला त्या गावाचे नाव मिळाले. खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना जमीनदारांविरुद्ध संघटित करणे हीच भारतीय क्रांतीची प्रमुख रणनीती असायला हवी असा या गटाचा विचार होता.

सर्व  प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षांनी  व्यवस्थेबरोबर तडजोड केलेली आहे आणि आता व्यवस्था बदलायची तर सशस्त्र क्रांतिशिवाय तरणोपाय नाही, अशी नक्षलवाद्यांची भूमिका होती. सत्तरच्या दशकात  या संघटनांनी ग्रामीण विभागात हिंसक बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हळूहळू डझनावारी नक्षली संघटना आणि पक्ष स्थापन झाले आणि ते सारे भूमिगत पद्धतीने काम करीत राहिले. त्यांचे  बंडाचे प्रयत्न सरकारने बळाचा वापर करून मोडून काढले. कालांतराने बहुतेक नक्षली संघटनांनी हिंसात्मक मार्गाचा त्याग केला. त्या संघटना लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत किंवा लोकशाही पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या  जनआंदोलनांच्या प्रवाहात सामील झाल्या. 

एके काळी अनेक आदर्शवादी तरुण, लेखक, कवी आणि कलावंत नक्षली आंदोलनाने प्रभावित झाले होते. परंतु   या हिंसक क्रांतीत सामील झालेल्या नक्षलींचेही हळूहळू अध:पतन होऊ लागले. त्यात  अकारण हिंसा, दांडगाई आणि खंडणीखोरीचा प्रादुर्भाव झाला. छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंडमधील  काही जिल्ह्यांत त्यांच्या भूमिगत हिंसक कारवाया चालू असतात. परंतु देशातील बहुतेक जनआंदोलनांनी आणि खुद्द नक्षली विचारधारेने प्रभावित संघटनांनीदेखील  हिंसक कार्यपद्धतीचा आता संपूर्ण त्याग केला आहे.  नक्षली आंदोलन आज  केवळ गतकालीन अवशेषांच्या स्वरूपातच शिल्लक राहिलेले आहे. ‘मग हे अर्बन नक्षल कोण आहेत?’ असे माझ्या तरुण साथीदाराने विचारले. “देशामधील एकही संघटना स्वत:ला अर्बन नक्षल म्हणवत नाही. मुळात  अशी कोणतीही विचारसरणी अस्तित्वातच नाही. अर्बन नक्षल ही फक्त एक शिवी आहे. मनाला येईल तेव्हा,  मनाला येईल त्या व्यक्तीला किंवा संघटनेला ही शिवी दिली जाते. भारत जोडो अभियानात अनेक गांधीवादी, समाजवादी, उदारमतवादी आणि आंबेडकरवादी संघटना सामील झाल्या आहेत. या सर्व संघटना  हिंसक राजकारणाला सातत्याने विरोध करत आलेल्या आहेत. पण त्यांच्यासाठीही ही शिवी वापरली जाते,” असे मी माझ्या साथीदाराला समजावून सांगितले. खुद्द मोदी सरकारनेच संसदेच्या सभागृहात अनेक वेळा सांगितले आहे, की अर्बन नक्षल नावाची कोणतीही गोष्ट सरकारी शब्दकोशात अस्तित्वात नाही. १२ मार्च २०२० ला तृणमूल काँग्रेसच्या खासदार  शांता छेत्री यांच्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी आणि ९ फेब्रुवारी २०२२ ला भाजप खासदार राजेश सिन्हा यांच्या प्रश्नाला  गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लेखी उत्तरे दिली, की अर्बन नक्षलनावाचा शब्द भारत सरकार कधीच वापरत नाही. सरकारला त्याबद्दल काहीही माहिती नाही. 

खरे तर ‘अर्बन नक्षल’ हे केवळ भाजपच्या मनातील भय आहे. आपल्या मनातील भयच भूत होऊन शेवटी आपलीच मानगूट धरते, ते हे असे!yyopinion@gmail.com

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा