शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ आहात? आज ना उद्या हे चित्र बदलेल..पण कसे?; छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देणं महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:12 IST

राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म या तीन गोष्टी सज्जनांना एकत्र आणतात, पण अनेकदा दुर्जनही याच तीन गोष्टींचा आधार घेऊन आपला डाव साधतात!

डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस

राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म या तीन गोष्टींच्या बाबतीत माणसाचे मन खूप हळवे असते. जगाच्या इतिहासात डोकावून बघितले तर आपल्या लक्षात येऊ शकेल की बहुतेक वेळा या तीन गोष्टींनी स्वतंत्रपणे अथवा एकत्रित येऊन लोकांना एकत्र आणण्याचे काम केले गेले आहे. ज्यावेळी हे एकत्र येणे  काही चिरंतन मानवी मूल्यांना पुढे नेणारे असते तेव्हा जगात खूप मोठ्या गोष्टी घडून येतात.

राष्ट्र कल्पनेला धरून लढवले गेलेले भारतासारख्या देशाचे स्वातंत्र्यलढे हे याचे उत्तम उदाहरण आहेत. राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म यांची गंमत अशी आहे की याच तीन गोष्टी जसे सज्जनांसाठी एकत्र येण्याचे महत्त्वाचे कारण असू शकतात तसेच अनेकवेळा दुर्जनदेखील याच तीन गोष्टींचा आधार घेऊन आपला डाव साधत असतात !

जर्मनी, इटली, रशिया, कंबोडिया अशा अनेक ठिकाणी हे घडलेले आहे. सध्याच्या कालखंडात आखातातील देशांवर इस्त्रायल आणि अमेरिकेने लादलेले युद्ध हेदेखील याचेच एक उदाहरण. भारतासह आशिया खंडातील अनेक देशांच्या राष्ट्र कल्पना आणि धर्म यांचा वापर करून आपले राजकारण पुढे ढकलण्याचे प्रयोग चालूच आहेत अशा परिस्थितीमध्ये केवळ चांगुलपणाच्या आधारे मानवी मूल्यांना धरून आपल्या आजूबाजूचे जग चालावे, असे वाटणाऱ्या लोकांना खूप हताशा येणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर हंगेरीसारख्या छोट्याशा देशात झालेला सत्ताबदल मात्र हे चित्र पालटू शकते असा आशावाद जागवणारा, मानवकेंद्री सज्जनपणावर आपला विश्वास वाढवणारा आहे. 

त्याचे झाले असे की हंगेरीमधील गेली पंधरा वर्षे जणू एकाधिकारशाही राबवणाऱ्या व्हिक्टर ऑर्बान यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निर्णायक पराभव झाला. अमेरिकेसारख्या सर्व शक्तिमान देशाचे पाठबळ, पंधरा वर्षांची अनिर्बंध सत्ता, जाणीवपूर्वक मोडकळीला आणलेल्या यंत्रणा, बळाचा आणि पैशाचा अनिर्बंध वापर या सगळ्याच्या विरोधात हंगेरीमधल्या लोकांनी भूमिका घेतली. 

जगाच्या इतिहासात डोकावून पहिले तर आपल्याला यामुळे धक्का बसावा असे काही नाही. ज्यांच्या राजवटीवरचा सूर्य कधीही मावळत नव्हता त्या ब्रिटिशांच्या साम्राज्याचा अंत झाला. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिनपासून अनेक एकाधिकारशहांचाही पराभव झाल्याचे दाखले फार जुने नाहीत. राष्ट्र विचारधारा किंवा धर्म यांच्या गारुडातून बाहेर पडायला लोक वेळ घेतात, पण आज ना उद्या ते स्वत:चा विचार करू लागतात. एकदा का योग्य विचारांनी जनसमूहांची पकड घेतली की मग भल्या भल्या दमनकारी राजवटीदेखील चुटकीसरशी कोसळू शकतात. लोक बदल घडवून आणतात- हाच हंगेरीतील सत्ता बदलाचा सांगावा आहे. आज ना उद्या हे चित्र पालटेल या भावनेने आपण आशावादी राहणे आणि आपल्या पातळीवर छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देत राहणे मात्र महत्त्वाचे आहे.    hamid.dabholkar@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Restless? Change is inevitable; support small changes for a better future.

Web Summary : Exploitation of nation, ideology, religion causes despair. Hungary's election offers hope, proving oppressive regimes fall when people think independently. Stay optimistic; support small changes.