शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - सरकारची नाचक्की

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल तर केदार यांना क्लीन चिट का देऊन टाकत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सरकारला केला. न्यायालयाच्या या सवालाने ‘पारदर्शी’ कारभाराचा ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केदारांच्या बचावासाठी सरकारने दारामागे काही राजकीय अ‍ॅडजेस्टमेंट तर केली नाही ना, थातूरमातूर चौकशी आटपून सरकार केदारांना पळवाट तर शोधून देत नाही ना, असेही अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत. केदार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत रोखे घोटाळा झाला. या प्रकरणी केदारांना अटकही झाली होती. ते काही महिने तुरुंगातही होते. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यावरून राज्य सरकार चालढकल करीत आहेत. चौकशीसाठी सहकार अथवा जिल्हा न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सरकारने ९ निवृत्त न्यायाधीशांची यादी तयार केली. त्यापैकी तीन न्यायाधीशांची संमती मिळविली. यापैकी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली जाईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी सुनावणीच्या वेळी चौकशी अधिकारी म्हणून एका निवृत्त न्यायाधीशांचे नाव समोर केले गेले, ते न्यायालयाला पसंत नव्हते. यामुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचे हे पाऊल ओळखून उच्च न्यायालयाला सरकारचे कान टोचावे लागले, ही सरकारवर ओढवलेली नामुष्कीच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांच्या विरोधात भाजपा उमेदवाराचा अर्ज रद्दबातल ठरला. रिंगणात भाजपाचा उमेदवार नसतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण शक्ती केदारांविरोधात शिवसेनेच्या पाठीशी उभी केली होती. केदार थोडक्यात बचावले. तेव्हापासून स्थानिक भाजपा कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर नगर परिषदेत केदारांना मात मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते काहीसे सुखावले होते. स्थानिक पातळीवर एवढा विरोध असताना सरकार मात्र केदारांना का वाचवित आहे, असा प्रश्न स्थानिक भाजपा नेत्यांना पडला असून, यामुळे त्यांची व बँकेतील घोटाळ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.