शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भागवत, भान आणि भविष्य! नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 06:29 IST

शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती

सलमान खान, अक्षय कुमार यांच्यापासून ते शिल्पा शेट्टी, रणबीर कपूर आणि नव्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळविलेल्या अदनान सामीपर्यंत झाडून साऱ्या बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी मायानगरी मुंबईत संघाचा दृष्टिकोन मांडला. यापैकी सलमान खान व अदनान सामीच्या हजेरीमुळे भागवतांची विधाने राजकीय वर्तुळाबाहेर चर्चेत आली. अर्थात, अनेकांच्या भुवया उंचावल्या. अदनान सामीच्या पाक पायलट वडिलांनी १९६५च्या युद्धात भारतावर हवाई हल्ले केल्याच्या कारणाने टीका झाली. प्रत्येक भारतीयाने तीन अपत्यांना जन्म देण्याचा मुद्दा, व्यक्ती-कुटुंब किंवा देशाच्या प्रगतीसाठी लोकसंख्यावाढ तारक की मारक या अनुषंगाने तसा वादाचा आहे. केवळ भागवतच नव्हे, तर अगदी दक्षिणेकडील काही राजकीय नेतेदेखील वेगळ्या परिप्रेक्ष्यात हा आग्रह धरीत आहेत. भागवत पुन्हा बोलल्यामुळे पुन्हा चर्चा झाली इतकेच.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, त्यामुळे पुरस्काराचा सन्मान होईल, हे भागवतांचे विधान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुखावणारे, तर काँग्रेसला डिवचणारे आहे. संघविचाराचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यामुळे संघाला ‘अच्छे दिन’ आले हे खरे नाही, तर संघामुळेच भाजपला वैभव प्राप्त झाले, ही स्पष्टोक्ती, तसेच वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर सरसंघचालक पदावर कायम का आहोत, याविषयी प्रांजळ कबुली, असे भागवतांच्या बोलण्यातील आणखी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यावरून वाद उभा झाल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. कारण, असे मानले जाते की, संघ तसा कधीच बदलत नाही. बदल दिसलेच तर ते वरकरणी असतात. संघविचाराचा गाभा कायम राहतो. असो.

शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती. मुंबईच्या वरळी सेंटरमधील दोन दिवसांच्या संवादाचा विषयच मुळात ‘संघाची शताब्दी व नवे क्षितिज’ असा होता. तेव्हा, या वरवरच्या कथित वादग्रस्त मुद्यांच्या पलीकडे सरसंघचालकांनी कोणते नवे क्षितिज समाजासमोर, देशासमोर ठेवले हे पाहणे गरजेचे ठरते. या अनुषंगाने भागवत यांची दोन विधाने ठळक आहेत. पहिले-अगदी अनुसूचित जाती किंवा जमातीसह हिंदू धर्मातील कोणीही रा. स्व. संघाचे सरसंघचालक बनू शकते आणि दुसरे- स्वच्छ व नैतिक अशा आदर्श कारभाराची सुरुवात व्यक्तींपासून व्हायला हवी. हे खरे आहे की, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची, व्यवस्थेची अपेक्षा मतदारांनी सरकारकडून धरायला हरकत नाही; परंतु अशा आदर्श व्यवस्थेची सुरुवात व्यक्तींपासून होते. व्यक्ती किंवा समाज नैतिक असेल तरच व्यवस्था तशी असू शकते. भागवतांचे याविषयीचे विधान एक कटू सत्य, जळजळीत वास्तव आहे.

सामान्य माणूस आणि विशेषत: राजकीय कार्यकर्त्यांचा वर्ग अत्यंत भाबडेपणाने शासन, प्रशासनाकडून स्वच्छ कारभाराची अपेक्षा बाळगतो. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात, दैनंदिन व्यवहारात स्वत:पासून तो स्वच्छतेची सुरुवात करीत नाही. भ्रष्टाचाराला राजमान्यता नंतर मिळते, आधी लोकमान्यता मिळालेली असते. तेव्हा, भ्रष्टाचारमुक्ती हवी तसेल तर प्रत्येक नागरिकाने स्वत:पासून सुरुवात करायला हवी. तो आग्रह केवळ वैयक्तिक पातळीवर नसावा. त्याविरुद्ध सार्वजनिक पातळीवर सतत बोलायलाही हवे, हे सरसंघचालकांना अभिप्रेत आहे. संघाची स्थापना, रचना व वाटचाल ही एका विशिष्ट जातीभोवती, म्हणजेच ब्राह्मण समाजाभोवती केंद्रित आहे, हा गेल्या शंभर वर्षांमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेेला मुद्दा आहे. बहुजन, दलित, अल्पसंख्याक समाज संघापासून दूर राहण्याचे हेच कारण आहे.

या मुद्यावर बोलताना भागवतांनी, संघ जात-पात मानत नाही, हिंदू समाजाचा एकत्रित विचार करतो असे पुन्हा एकदा सांगताना कोणत्याही जातीची, अगदी अनुसूचित जाती किंवा जमातीची व्यक्ती संघाचे प्रमुखपद भूषवू शकते, असा निर्वाळा दिला. त्याचे स्वागत करायला हवे. तथापि, संघाचे नवे क्षितिज असे सर्वसमावेशी करताना चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातींची उतरंड नाकारावी लागेल. जात-पातविरहित समाजरचनेचा पुरस्कार करावा लागेल. कारण, ही उतरंड हे हिंदू संस्कृतीचे अटळ वैशिष्ट्य आहे. कर्मावर आधारित जातीची उतरंड संघ नाकारेल का, भागवत म्हणतात तसे तळाचा माणूस सरसंघचालक होईल का, ही खूप दूरची गोष्ट झाली. खरेच असे होईल का हे कोणीही सांगू शकत नाही. तूर्तास त्या दिशेने भागवतांनी नवे क्षितिज म्हणून दाखविलेल्या रेषेचे, मानसिक तयारीचे स्वागत व्हावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagwat's Vision: New Horizons, Acceptance, and Future of the RSS

Web Summary : Mohan Bhagwat's Mumbai address sparked debate, from celebrity attendance to population policies. His call for inclusive leadership within the RSS and focus on individual ethics for systemic change are key takeaways. Welcoming this shift, though challenges remain in dismantling caste hierarchies.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाHinduहिंदू