शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस, मिजास कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 06:09 IST

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची नुकत्याच झालेल्या भारत भेटीत मोठी अवघडल्यासारखी स्थिती झाली.

- संजीव उन्हाळे(ज्येष्ठ पत्रकार)अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची नुकत्याच झालेल्या भारत भेटीत मोठी अवघडल्यासारखी स्थिती झाली. एका बाजूला जगातील मोठी आॅनलाइन बाजारपेठ अन् दुसऱ्या बाजूला सरकारचा नाराजीचा सूर अन् त्यात देशातील अनेक शहरांत किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेला निषेध. त्यातून मोठ्या संयमाने बेझोस यांनी येत्या पाच वर्षांत १० लाख डॉलर्सची गुंतवणूक, शंभर नवी व्यापारी केंद्रे अन् १० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याची शाही घोषणा केली.२०१४ मध्ये हेच बेझोस भारतात आले तेव्हा लाल पायघड्या घालून स्वागत झाले आणि या भेटीत पुरते बेदखल. पंतप्रधानांनी तर अगोदरच भेट नाकारली होती. तथापि, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी भारतात अ‍ॅमेझॉन गुंतवणूक करीत आहे म्हणजे उपकार करीत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया दिली. बेझोसच्या आगमनापूर्वी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटच्या चौकशीचे आदेश दिले.

अनुचित व्यापारी प्रघात अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून पाडले जातात, असा ठपका ठेवण्यात आला. अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टचलित फ्लिपकार्ड व्यापारी सेवेने तटस्थ बाजारपेठ म्हणून काम करावे, अशी अपेक्षा आहे. ई-वाणिज्य सेवेच्या माध्यमातून व्यापारी वस्तूंची यादी नियंत्रित करणे किंवा त्याच्या किमती प्रभावित करणे अपेक्षित नाही अन् सध्या नेमके हेच घडत आहे.अ‍ॅमेझॉनने भारतात ३७ टक्के व्यापारी जम बसवला आहे. तरुणांत हे फॅड आणखीन वाढतच आहे. त्यामुळे ७ कोटी छोटे व्यापारी अन् त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अगदी पहिल्या फटक्यातच मोबाइल, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, किराणा आणि जनरल स्टोअर्स, अशी अनेक क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. या बदल्यात अ‍ॅमेझॉन रोजगार म्हणून पार्सल वितरण करणारी मुले आणि आॅपरेटर्सच्या नोकºया देण्याचे मधाचे बोट दाखवत आहे.वस्तुस्थिती अशी आहे की, देशी रिलायन्सचे जाळे ६ हजार ७०० शहरांत ११ हजार वितरक आहेत. केवळ भारतीय कंपनीला पाठिंबा देण्यासाठी अ‍ॅमेझॉनला निश्चितच विरोध झालेला नाही. असा कयास आहे की, जेफ बेझोस यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट या आघाडीच्या वर्तमानपत्राची मालकी आहे. या वृत्तपत्राने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधी भूमिका घेतली आहे. ‘वड्याचे तेल वांग्यावर काढायचे’ याप्रमाणे वॉशिंग्टन पोस्टच्या भूमिकेचा राग बेझोस यांच्यावर तर काढला नाही ना, अशी शंका विदेशनीतीचे तज्ज्ञ विजय चौथाईवाले यांच्या प्रतिक्रियेवरून येते.खरी गोम अशी आहे की, भाजप सत्तेच्या दुसºया टर्ममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘अजेंडा’ तंतोतंत राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा अनेक गोष्टींची राबवणूक करून अप्रत्यक्षपणे ‘हिंदू रिपब्लिक’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता अशीच स्वदेशी अजेंडा विशद करणारी संघभूमिका अर्थनीतीबद्दल घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट परदेशी गुंतवणुकीला विरोध नसल्याचे सांगितले; पण ही गुंतवणूक आम्हाला गरज असलेल्या क्षेत्रातच व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय व्यापार कोणत्याही परिस्थितीत प्रभावित होऊ नये व या व्यापाराचे नियंत्रण भारतीयांकडेच असावे, असे सूचित केले आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये आशिया खंडातील तब्बल १४ देशांशी होणाºया महत्त्वपूर्ण प्रादेशिक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली नाही.

इंदिरा गांधींच्या काळात पूर्वाश्रमीच्या जनसंघाला ‘भारतीय बनिया पार्टी’ म्हणजे व्यापाºयांचा पक्ष म्हणून हिणवले जायचे. अर्थात, त्या काळचा व्यापार आणि परिस्थिती वेगळी होती. या अडचणीच्या स्थितीमध्ये सबका साथ घेताना खºया अर्थाने बनिया के हातव्यापारउदीम कसा राहील, हे पाहण्याची गरज आहे. अखिल भारतीय व्यापारी संघटनेने या आॅनलाइन व्यापाराचे वर्णन ‘आर्थिक दहशतवाद’ आणि आर्थिक घुसखोरी असे केले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. मुळामध्ये ही असमान स्पर्धा आहे. तिथे अमेरिकेत अत्यल्प व्याजदराने मोठा पैसा उपलब्ध होतो आणि इथे बँकांच्या जाचातून मोठ्या व्याजाने थोडे कर्ज काढावे लागते. ही असमानता दूर करणे इतके सोपे नाही.तथापि, खुल्या अर्थव्यवस्थेत विक्रय तंत्रामध्ये पारंगत असलेल्या बेझोसचा मिजास रोखणे भारताला शक्य आहे काय? अ‍ॅमेझॉनकडे पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही डिजिटल डेटाची समृद्धी मोठी आहे. भारतीय तरुण ग्राहकांचा कौल त्यांच्याच बाजूने आहे. छोटा व्यापारी अन् उत्पादक कोलमडला तरी चालेल; पण ग्राहकाला आकर्षित करणारी ‘सबसे सस्ते दिन’ योजना आहे. त्यामुळेच ही ग्राहकाश्रित कंपनी देशाच्या कानाकोपºयात पसरली आहे. दुसºया बाजूला मोदींचे बहुमताचे बलदंड सरकार आहे; पण त्यासाठी आर्थिक क्षेत्रात तळ्यात-मळ्यात करून चालणार नाही. परदेशी गुंतवणूक आम्ही म्हणू त्याच क्षेत्रात, असे आग्रह टिकणार नाही. नुसताच स्वदेशीचा नारा देऊन भागणार नाही. व्यापार वाचविण्यासाठी ठोस आर्थिक भूमिका घेतली नाही तर नुसताच अ‍ॅमेझॉनविरुद्ध नाराजीचा सूर आळविण्यात अर्थ नाही.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था