शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:21 AM

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत.

- हभप बाबामहाराज सातारकरज्येष्ठ कीर्तनकार

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी विठूरायाची पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त व देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे. ‘विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचा जीवभाव...’ असा अनुभव येत आहे.‘विठ्ठल आमुचे जीवन’ असे संतवचन आहे. विठ्ठलाची वारी हे आमुचे जीवन आहे. खरे तर माणसे म्हणतात, ‘मी वारी चालतो.’ मी म्हणतो, वारीमुळे जीवन चालते. वारी ही परमार्थाची भूक; त्यामुळे विठ्ठल आमुचे जीवन आहे, जीवभाव आहे. वारीत विठ्ठलभक्ती आहे तसेच श्रवणसुख आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हा सामाजिक ऐक्याचा संदेशही वारीतूनच दिला जातो.‘‘धन्य आजि दिन, जाहले संतांचे दर्शन...’ संतांचे दर्शन माणसाला सुख देणारे असते. समाधान देणारे असते.‘जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत।।’संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी इतरांसाठी भक्तियोग आणला.‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी...’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माउली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे, हा वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. वारीनेच सामाजिक क्रांती घडविली आहे. लाखो भाविकांना कोणी न बोलावता ते या सोहळ्यात सहभागी होतात. त्यात सख्या पांडुरंगाची भेट, आतुरता, उतावीळता, जिव्हाळा असतो. परमात्म्यास बद्ध करण्याची ताकद वारीतील भक्तीत आहे. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे‘विठ्ठल टाळ। विठ्ठल दिंडी।।विठ्ठल तोंडी उच्चारा। आणि शेवटीविठ्ठल अवघा भांडवला।।

असा भाव वारीतील प्रत्येका ठायी असतो. पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचार आणि विचार धर्म आहे. ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. त्याचेच दर्शन आपल्याला वारीच्या सोहळ्यात होत असते.माणसं वारीत आली की एकमेकांना माउलीशिवाय बोलत नाहीत. माउली-तुकोबांचा हा सामाजिक आध्यात्मिक सिद्धांत आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म...’ हा अनंतकाळापासून चालत आला आहे. त्याला पुंडलीक व माउलींच्या काळापासून मूर्तरूप आले आहे.मी विनोदानं नेहमी सांगत असतो, माणूस वैैकुंठाला गेला, की परत येत नसतो. आम्ही वर्षातून तीन वेळा जातो आणि वैैकुंठाला जाऊन परत येतो.भूवैैकुंठ म्हणे तुका ।अधिक अक्षरे आली एका ।।भूवैैकुंठ म्हणे तुका।। म्हणून एकदा मला एका व्यक्तीने विचारले, ‘इतके दिवस दिसला नाहीत?’ त्यावर मी म्हटले, ‘वैैकुंठवासी होतो.’ त्यावर तो मनुष्य माझ्या तोंडाकडे पाहून अवाक् झाला आणि म्हणाला, ‘हे काय महाराज बोलताय! वैकुंठवासी म्हणजे काय?’ त्यावर मी त्याला म्हटले, ‘वैैकुंठ म्हणजे पंढरपूर.’हे पाहा, जिथे राष्ट्रपती राहतात ते त्या देशाचे मूळ स्थान असते. खरंय ना? दिल्ली ही जशी देशाची राजधानी आहे. त्यामुळे प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती तेथे राहतात. म्हणून देशाची ती राजधानी. गव्हर्नर अर्थात राज्यपाल जेथे राहतात, ती राज्याची राजधानी. आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई का? तर तिथे गव्हर्नर राहतात म्हणून. तसं जिथं पांडुरंग राहतो, ते वैैकुंठ होय.वैैकुंठ वैैकुंठ नव्हे. म्हणून जिथे पांडुरंग उभा आहे ते आमचे वैैकुंठ आहे. म्हणून आम्ही दरवर्षी तीन वेळा वैैकुंठाला जाऊन परत येतो आणि या भूवैकुंठाचे वैैशिष्ट्य असे आहे, दर्शन झाल्यानंतर माणसाला इतका आनंद वाटतो, तो अवर्णनीयच असतो.विठ्ठलाचे ते सावळे, सुंदर असे रूप बघितल्यावर डोळ्यांना धारच लागते. काय आश्चर्य आहे पाहा! आस्तिक असू दे वा नास्तिक असू दे; सर्वांना एकच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती मला परवाच म्हणाली, ‘अहो मी पहिल्यांदाच दर्शनाला गेलो आणि माझ्या डोळ्याला धार लागली.’ काय साक्षात्कार आहे! मी म्हणतो, साक्षात्कार नव्हे, तर साक्षात आकार प्रभूचा.पांडुरंगाची ती मूर्ती नसून साक्षात आकार प्रभूचा आहे, हे कळणं हाच पंढरपूरला झालेला साक्षात्कार आहे.

म्हणून‘तेथिले तृण आणि पाषाण।तेही देव जाणावे ।।असे जेव्हा नामदेवराय म्हणतात, त्यावर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून वारीची वाट चालावी. आपली प्रतीतीसुद्धा एक दिवस या अवस्थेत पोहोचून परिपक्व होईल. आज चंद्रभागेला भरते आले आहे. लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत, भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त आणि देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर