शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाची निरर्थकता दाखवणारं, २० वर्षं जगभर फिरलेलं चित्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:18 IST

स्वत:च्या हयातीत आपलं हे चित्र मायदेशी गेल्याचं पिकासो पाहू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी अमेरिकेनं ते स्पेनमध्ये परत पाठवलं.

शर्मिला फडकेख्यातनाम कला समीक्षक, लेखिका

एक काळं-पांढरं, आयताकृती, असंख्य गुंतागुंतीच्या आकृत्या असलेलं चित्र. युद्धाचं प्रातिनिधिक चित्रण म्हणून त्याला अमाप लोकप्रियता लाभली. स्पेनच्या बास्के प्रांतावर जर्मनीने बॉम्बहल्ला केला, त्यानंतर १९३७ साली स्पॅनिश चित्रकार पिकासोने ते काढलं. बॉम्बहल्ला झाला त्यावेळी पिकासो पॅरिसमध्ये रहात होता. स्पॅनिश सरकारने एका जागतिक प्रदर्शनाकरिता म्युरल काढण्याचं काम त्याला दिलं होतं. स्पेनमध्ये सरकारविरुद्ध लष्करी क्रांती पुकारली गेली होती. पिकासोला कलेचा राजकारणाशी संबंध यायला नको होता, पण पैशांकरिता त्याने हे काम स्वीकारलं; नाखुषीमुळे रेंगाळत ठेवलं. मात्र काही महिन्यांनी जर्मनीने सतत तीन तास केलेल्या संहारक बॉम्बहल्ल्यात गेर्निका शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालं. असंख्य नागरिक मारले गेले, जखमी झाले. हा विध्वंस पाहून व्यथित मनाने पिकासोने म्युरल रंगवायला घेतलं. 

११.५ × २५.५ फूट आकाराचं, क्युबिस्ट, गुंतागुंतीची रचना असलेलं हे चित्र पिकासोने फक्त तीन आठवड्यात रंगवलं. इतका प्रचंड विध्वंस चितारायला अशाच आकाराची गरज होती. चित्र जागतिक प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर लावलं गेलं. येणाऱ्याची पहिली नजर त्यावर पडत होती. चित्रातल्या आकृत्या मनावर ताण आणणाऱ्या. वेदनेने खिंकाळणारा घोडा चित्राच्या मधोमध, डाव्या बाजूला एक वेडापिसा उन्मत्त बैल. एका लहान मुलीला आईने कसंबसं उचलून धरलं आहे.

उजवीकडे दिवा धरलेली एक भुतासारखी बीभत्स आकृती, बाजूला हात वर करून उभी असलेली हताश, असहाय स्त्री. बाकी सर्वत्र ज्वाळा, विव्हळणारे चेहरे, तुटके अवयव, मानवी क्रौर्य, विध्वंसाच्या खुणा कॅनव्हासभर विखरून. एकेरी काळ्या-पांढऱ्या रंगसंगतीमुळे चित्रामधलं औदासिन्य जास्त अंगावर येतं. युद्धामुळे होणारी निरर्थक हिंसा, आयुष्याची दैना मनावर काजळी धरते. प्रदर्शन संपल्यावर चित्र स्पेनला परत करायला पिकासोने विरोध केला. तिथे लोकशाहीचं राज्य येईपर्यंत चित्र देशाबाहेरच राहील, असं निक्षून सांगितलं. त्यामुळे पुढची अनेक वर्षे चित्र अज्ञातवासात राहिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रान्सवर कब्जा केलेल्या नाझी सैन्याच्या भीतीने पिकासोने चित्र न्यूयॉर्कला पाठवलं. पुढची वीस वर्षे ते जगभर फिरत राहिलं. लोक झुंडीने पाहायला गर्दी करत. जागतिक महायुद्धाने झाकोळलेल्या मनांना चित्राचा अर्थ उलगडून सांगण्याची गरज उरली नाही.

आपल्या हयातीत चित्र मायदेशी गेल्याचं पिकासो पाहू शकला नाही. त्याच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी अमेरिकेनं चित्र स्पेनमध्ये परत पाठवलं. चित्राच्या प्रतीकात्मकतेवर अजूनही चर्चा होत राहते. जगात जोवर युद्ध होत राहतील, त्यातले संदर्भ ताजे राहतील. काही चित्रांचं अमरत्व आणि लोकप्रियता नकोशी वाटते.

English
हिंदी सारांश
Web Title : Guernica: Picasso's anti-war masterpiece, traveled world for 20 years.

Web Summary : Picasso's Guernica, a powerful anti-war statement depicting the horrors of the bombing, toured globally for two decades, resonating with audiences worldwide. Its symbolism remains relevant amid ongoing conflicts.
टॅग्स :paintingचित्रकला