शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

कमखेड्यात युवकाचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:08 IST

नंदुरबार येथील महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा शिवारात युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत नंदुरबार येथील महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

विलास ऊर्फ विशाल प्रकाश कोळी (२२, रा. शिवाजी चौक, पोस्ट ऑफीस गल्ली, खेतीया, ता. पानसेमल, जि. बडवानी) असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवकाची आई भारतीबाई प्रकाश कोळी यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रविवारी सकाळी साडेसात वाजेच्यापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा गावाच्या शिवारात संजय नारायण शिंदे यांच्या शेताच्या बांधावर रोडलगत विलास कोळी हा मृतावस्थेत मिळून आला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागाीय पोलीस अधिकारी अनिल माने, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. तपास सुरू असताना रेशमा ऊर्फ लक्ष्मी ज्ञानदेव काशीकर (रा. कजंरवाडा, नंदुरबार) या महिलेसह इतर साथीदारांनी अज्ञात कारणावरून कुठल्यातरी वस्तूने गळा आवळून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे वाढीव कलमान्वये त्या महिलेविरुध्द संशयावरून खुनाचा गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आला.

दरम्यान, १ एप्रिल रोजी दोंडाईचा येथे शाहबाज शाह गुलाब शाह, २ एप्रिल रोजी धुळ्यात विशाल गरुड, ८ एप्रिल रोजी साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे देवेंद्र साळवे आणि ११ एप्रिल रोजी धुळ्यातील कुमारनगरात वासुदेव दर्यानानी या व्यवसायिकाच्या खुनाची घटना घडली आहे.