शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मेहेरगाव येथील त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

धुळे : कावठे ता. धुळे शिवारात विहिरीमध्ये मृतदेह सापडलेल्या विजय विक्रम देसले (४१, रा. मेहेरगाव ता. धुळे) या तरुणाचा ...

धुळे : कावठे ता. धुळे शिवारात विहिरीमध्ये मृतदेह सापडलेल्या विजय विक्रम देसले (४१, रा. मेहेरगाव ता. धुळे) या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, सोनगिर पोलिसांनी या गुन्ह्याचा एकाच दिवसात तपास लावून प्रवीण ऊर्फ भटू शरद भामरे या संशयिताला अटक केली आहे.

मयत विजय देसले हा शनिवारी शेतात जातो असे सांगून गेला होता. परंतु तो घरी परतला नसल्याने त्याचे काका ज्ञानेश्वर देसले यांनी सोनगिर पोलिसांत हरविल्याची नोंद केली होती. दरम्यान, मंगळवारी कावठे शिवारामध्ये शरद नारायण भामरे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु खून झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले. कुणीतरी घातक शस्त्र डोक्यात मारून त्याचा खून केला असावा या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना त्या दिशेने तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, मयत विजय देसलेचे काका सयाजीराव देसले यांच्या फिर्यादीवरून सोनगिर पोलिसांनी प्रवीण ऊर्फ भटू शरद भामरे (२३, रा. मेहेरगाव) याच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, हा संशयित धुळे शहरात आपल्या मित्राकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोनगिर पोलिसांनी बुधवारी सापळा रचून त्याला अटक केली.

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे, हवालदार शामराव अहिरे, अशोक पवार, शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, जाकिरोद्दीन शेख, अतुल निकम यांनी सापळा रचून संशयिताला पकडले.