पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
धुळे : साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील दादाभाई बुधा कलगुंडे (२८) हा तरुण शेतातील विहिरीतील पाण्यात आढळून आला. घटना लक्षात येताच पोलीस आणि गावातील लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. खासगी वाहनाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
क्षुल्लक कारणावरून वाद
धुळे : नळाचे पिण्याचे पाणी अंगणात वाहून आल्याच्या कारणावरून दोन परिवारांमध्ये वाद होऊन शिवीगाळीपर्यंत तो विकोपाला गेल्याचा प्रकार देवपुरातील विष्णूनगर भागात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास अनिता दीपक कांबळे या तरुणीने देवपूर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. देवपूर पोलीस तपास करीत आहे.