शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:21 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव : खान्देशातून येतात भाविक

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या पांडूरंगाची यंदाच्या वर्षी होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ याठिकाणी खान्देशातून भाविक येत असतात़शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाºया श्री पांडुरंगाची यंदा १ जुलै रोजी यात्रोत्सव येत आहे़ यात्रोत्सवाला ३७ वर्षांची परंपरा असून यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे़ त्यामुळे यात्रोत्सवात येणारे भाविक, व्यवसाय, दुकानदार, पूजा-पत्री, नारळ, फुल- हार विक्रेते, संसार उपयोगी साहित्य विकणारे, हॉटेल इत्यादी व्यवसायिकांनी यात्रेला येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे़ तसेच या दिवशी श्री पांडुरंगाची नित्यनेमाने पूजा, काकडा आरती, अभिषेक हे धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. या काळात होणाºया कीर्तन व भजन सोहळा देखील रद्द करण्यात आलेला आहे़पायी दिंडी सोहळाही रद्दशिरपूर तालुक्यातील बाळदे येथे येणाºया भाविकांची संख्या सर्वाधिक आहे़ खान्देशातील भाविक याठिकाणी होणाºया यात्रोत्सवासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी येत असतात़ त्यात हजारो भाविकांचा समावेश आहे़ पण यंदाच्या वर्षी यात कोरोनामुळे बदल करण्यात आलेला आहे़ भाविकांनी आपापल्या घरी श्री पांडुरंगाचे नामस्मरण व पूजा पाठ करावा याबाबत सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हभप तथा माजी आमदार संभाजीराव हिरामण पाटील, मनोहर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, निलेश पाटील व इतर विश्वस्त यांनी भाविकांना केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे