शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

महिलांनी अधिकारांबाबत जागरुक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:53 PM

शिरपूर : आर.सी. पटेल महाविद्यालयात महिला अत्याचारविषयक कार्यशाळेत अ‍ॅड.रेखा पहुजा

शिरपूर : पुरुष व महिला समान आहेत. तथापि, महिला त्यांच्या हक्कांबाबत जागरूक नसल्यामुळे मागे पडतात़ दुर्दैवाने जर एखादी वाईट घटना महिलांच्या बाबतीत घडल्यास पीडित महिलेने किंवा तिच्या नातेवाईकांनी ३ महिन्याचा आत कलम ३५४ अन्वये लेखी स्वरुपात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील मणियार विधी महाविद्यालयाच्या अ‍ॅड.डॉ़रेखा पहुजा यांनी केले़शहरातील आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी घटनेतील स्त्री-पुरुष समानता, मुले आणि महिला यांना असलेले अधिकार, सरकारी कार्यालयातील कामांचे समान विभाजन याबाबतही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.जी. सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.ए.एम. पाटील, डॉ.एच.बी. पाटील, डॉ.आर.एस. पवार, प्रा.आर.पी. महाजन, प्रा़शुभांगी पिंगळे आदी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील म्हणाले, महिलांनी स्वत: आत्मसन्मान मिळवून अत्याचाराविरुद्ध संघर्ष केल्यास कोणीही त्यांचा गैरफायदा घेऊ शकत नाही. या कार्यशाळेत १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे संयोजन डॉ.ज्योती महाशब्दे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राजश्री चौधरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, संजय मोरे, बी.टी. चौधरी, विजय कासार व राहुल पाटील आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dhuleधुळे