भररस्त्यात महिलेचा दारु पिऊन धिंगाणा, पोलिसांना अरेरावी अन् शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:54 IST2021-03-17T09:50:44+5:302021-03-17T09:54:29+5:30
धुळेनजीक मुंबईृ-आग्रा महामार्गावर एका 40 वर्षीय महिला आणि तिच्यासमेवत असलेली व्यक्ती रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी, नरडाणा जुन्या टोलनाक्याजवळील पोलीस अधिकाऱ्याने संबंधितांना हटकले

भररस्त्यात महिलेचा दारु पिऊन धिंगाणा, पोलिसांना अरेरावी अन् शिवीगाळ
धुळे - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एक महिला दारुच्या नशेत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत हुज्जत घालताना दिसून येते. महिला पोलीस अधिकारी या महिलेला पोलीस गाडीत बसण्यास सांगत आहे. मात्र, ती महिला नकार देत पोलिसांना अरेरावी करत आहे. या व्हिडिओवरील कमेंटमध्ये अनेकांनी पोलिसांनाही टार्गेट केलंय. मुंबई-आग्रा महामार्गावरील ही घटना असल्याचे उघडकीस आले असून महिला आणि तिचा दीर दोघेही दारु पीत बसल होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
धुळेनजीक मुंबईृ-आग्रा महामार्गावर एका 40 वर्षीय महिला आणि तिच्यासमेवत असलेली व्यक्ती रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी, नरडाणा जुन्या टोलनाक्याजवळील पोलीस अधिकाऱ्याने संबंधितांना हटकले. मात्र, या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेने पोलिसांना अरेरावी केली. त्यानंतर, महिला पोलिसांना बोलविण्यात आले. तरीही, या महिलेने तेच वर्तन केले. महिला पोलीस अधिकाऱ्याशीही हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अलका किशोर पाटील (वय 40, रा.डोंगरे महाराज नगर, पारोळारोड धुळे) आणि भूषण ज्ञानेश्वर पाटील (वय 31, रा.शिंदखेडा) असे नाव सांगितले. या दोघांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. महिलेसह दोघांनी मद्य प्राशन केले होते.
नरडाणा टोल नाक्याजवळ एक महिला दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या जुन्या टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला महिला व एक पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत बसलेले होते. दोघांनीही मद्य सेवन केले होते. यामुळे पोलिसांनी दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितले, याचा राग आल्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील महिलेसह दोघांनी गस्तवर आलेल्या उपनिरीक्षक शरद पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसंच त्यांच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलविण्यात आले. नंतर महिला पोलिसाला बोलविण्यात आले. त्या महिला पोलिसालाही मद्यपी महिलेने अश्लील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर, महिला पोलीस अधिकाऱ्याने संबंधित महिलेसह तिच्यासमवेत असलेल्या व्यक्तीला गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेले, तेथे चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.