कंंटेनरच्या धडकेत महिला ठार; धुळे तालुक्यातील सावळदे फाटाजवळील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: May 8, 2023 18:23 IST2023-05-08T18:23:03+5:302023-05-08T18:23:21+5:30
चाळीसगाव - धुळे मार्गावरील धुळे तालुक्यातील सावळदे फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला कंटेनरने जोरदार धडक दिली.

कंंटेनरच्या धडकेत महिला ठार; धुळे तालुक्यातील सावळदे फाटाजवळील घटना
धुळे: चाळीसगाव - धुळे मार्गावरील धुळे तालुक्यातील सावळदे फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला कंटेनरने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अशाेक देवराम सोनवणे (रा. बोरविहीर, ता. धुळे) यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील सावळदे फाट्यावर पत्नी रेणुका अशाेक सोनवणे (रा. बोरविहीर, ता. धुळे) ही धुळ्याकडे येणाऱ्या वाहनाची वाट पाहत उभी होती. भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात रेणुका सोनवणे ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनवणे करीत आहेत.