शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वीजेचा धक्का लागून वायरमनचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:47 IST

अजनाळे शिवारातील घटना : रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद नाही

कुसुंबा :विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारात रविवारी सकाळी घडली़ या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली़शंकरसिंग गिरासे (३८) असे त्या मयत वायरमनचे नाव आहे़ धुळे तालुक्यातील अजनाळे, पाळद आणि बल्लाणे या तीन गावांतील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती़ त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरु होते़ सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास ते विजेच्या खांबावर चढून आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला आणि क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत वीजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यानंतर ते खांबावरच लटकलेले होते़ घटनेवेळी त्यांच्यासोबत खांबाजवळ एक सहकारी देखील असल्याची माहिती मिळत आहे़ ही घटना समजताच खांबाजवळ गर्दी जमा झाली होती़ त्यांना खांबावरुन खाली उतरविल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून शंकरसिंग गिरासे यांना मृत घोषित करण्यात आला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहाजवळ आणल्यानंतर गर्दी जमा झाली होती़ याठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेराव घातला होता़गिरासे यांचे मूळ गाव धुळे तालुक्यातील कुंडाणे आहे़ ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून कुसुंबा येथील भगवती कॉलनीमध्ये वास्तव्यास होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ त्यांचे वडीलही वीज वितरण कंपनीत कार्यरत होते़ त्यांच्या निधनामुळे त्यांची अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती़ वीज कंपनीमध्ये ते गेल्या बारा वर्षापासून कार्यरत होते़ रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Dhuleधुळे