Weapons seized from Priyadarshani town | प्रियदर्शनी नगरातून तरुणाकडून शस्त्र जप्त

प्रियदर्शनी नगरातून तरुणाकडून शस्त्र जप्त

धुळे : देवपूर पोलिसांनी शनिवारी दुपारी नगावबारी परिसरात असलेल्या प्रियदर्शनी नगरात छापा टाकून तलवार, कुºहाड, चाकूसह बेसबॉलचा दांडे जप्त केले़ या कारवाईमुळे नगावबारी परिसरात चर्चेला उधाण आले आहे़ 
शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आले़ सुनील रामु मरसाळे (२६) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून दोन मोठ्या लोखंडी कुºहाड, एक लहान कुºहाड, दीड फुट लांबीची करवत, एक तलवार, लोखंडी चाकू, बेसबॉलचे दांडके असा ४१० रुपयांचा ऐवज पोलिसांनी छापा  टाकून जप्त केला आहे़ 
याप्रकरणी पोलीस नाईक जब्बार शेख यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार सुनील मरसाळे या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल चिंचोलीकर घटनेचा तपास करीत आहेत़ 

Web Title: Weapons seized from Priyadarshani town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.