शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:24 IST

दाऊळ पाणीपुरवठा योजना । अनेकांच्या उपस्थितीत योजनेचे झाले लोकार्पण

दोंडाईचा : दोंडाईचा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीत पुरेसा जलसाठा व नगरपालिकेकडे पाणीपुरवठ्याची अद्ययावत सामुग्री असूनही जलवाहिनीचा किरकोळ दुरुस्ती अभावी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास अडचण होती. परंतु दोंडाईचा नगरपालिकेने दहा वर्षांपासून धूळ खात पडलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त केल्याने आता दोंडाईचा शहराला नियमित दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य झाल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दाऊळ येथील जलवाहिणीचे लोकार्पण करतांना केले.दोंडाईचा शहराला तापी नदीतून पाणीपुरवठा होतो. तावखेडा तापीनदीतुन पाणी इन्टेक वेल व जँकवेलद्वारे दोन स्वंतत्र जलवाहिन्यामार्फत दाऊळ जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध केले जाते. परंतु तेथून फक्त एका जलवाहिनीमार्फत दोंडाईचा येथील जलकुंभात पाणी टाकले जात होते. त्यामुळे तापी नदीत भरपूर पाणी असूनही दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास अडचण होती. पाणीपुरवठा बाबत असलेली अडचण आमदार जयकुमार रावल व नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा लक्षात आल्यानंतर युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे आदेश देण्यात आलेत. सदर जलवाहिनी जागोजागी खंडीत झाली होती. बरेचसे एअर व्हॉल्व चोरीस गेले होते. जलवाहिनीच्या सपोर्टसाठी असणारे चेअर दुरुस्त करण्यात आल्यात.सदर दुरुस्तीचे काम नगराध्यक्षा नयनकुवर रावल, मुख्याधिकारी डॉ़ दीपक सावंत, पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम लॉकडाऊन काळात युद्धपातळीवर करण्यात आले. जलवाहिनी दुरूस्त केल्याने शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य झाले असून नवीन पाणीपुरवठा योजना दीपावलीपर्यंत पूर्ण होऊन शहराला नियमित एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले.कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ दीपक सावंत, रविंद्र उपाध्ये, प्रविण महाजन, निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, राजेश जाधव, भरतरी ठाकूर, चिरंजीवी चौधरी, कृष्णा नगराळे, संजय तावडे, हितेंद्र महाले, किशन दोधेजा, नरेंद्र गिरासे, रविंद्र जाधव, इरफान पिंजारी, गिरीधारी रुपचंदानी, डॉ़ मुकुंद सोहनी, राजेश मुणोत आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे