तालुक्यातील ३९ गावांचा पाणीप्रश्न सोडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:04 IST2019-09-24T22:03:42+5:302019-09-24T22:04:30+5:30
धुळे : कुणाल पाटील यांचे प्रतिपादन, वडजाई येथे जनतेशी साधला संवाद

dhule
धुळे : शेतकरी केंद्रबिंदू मानून सिंचनाची कामे केली. जवाहर सिंचन चळवळीतून केलेल्या कामांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि हजारो एकर कोरडवाहू जमीन बागायती झाली आहे. तालुक्यातील ३९ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी वडजाई येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
तालुक्यातील वडजाई, पिप्री, सौंदाणे, नरव्हाळ, उडाणे, गोताणे, सांजोरी गावात जाऊन आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांशी आणि तरुणांशी संवाद साधला.
यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निलंबित होणारा मी पहिला आमदार होतो. नैसर्गिक संकटात धावून जात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लढा दिल्याचे आमदार पाटील यांनी वडजाई येथे कार्यक्रमात सांगितले. यावेळी पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, खरेदी विक्रीचे व्हा. चेअरमन दिनकर देवरे, संचालक रावसाहेब पाटील, गरताड सरपंच अरुण पाटील, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजीव पाटील, वडजाई सरपंच सतीश सुर्यवंशी, सौंदाणे सरपंच कमलबाई अमृत पाटील, अनिल पाटील, आर.के.देवरे, महादू सुर्यवंशी, सुरेश पाटील, भटू पाटील, किरण सुर्यवंशी, सौंदाणे येथील आशानंद पाटील, अनिल पाटील, हिंमतराव पाटील उपस्थित होते.