शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जिव्हाळा’ महिला नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:01 IST

आमदारांकडून मदतीचे आश्वासन : संघातर्फे जनजागृती कार्यक्रम

पिंपळनेर : येथे जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार मंजुळा गावीत होत्या. तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सहसचिव डॉ.सुलभा कुवर उपस्थित होत्या.शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष संरक्षण कायदा केला असून ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. माझ्यापरीने मी ज्येष्ठांना ज्या-ज्या योजना असतील त्यातून सर्वतोपरी मदत करेल. आमदार निधीतूनही ज्येष्ठ नागरिक संघाला निधी मिळवून देईल, असे आमदार मंजुळा गावीत यांनी पिंपळनेर येथील जिव्हाळा महिला संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विचार व्यक्त केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विश्वासराव भदाणे, फेस्काम खान्देशचे कोषाध्यक्ष वासुदेव भदाणे, सहसचिव डॉ.रमाकांत शिरोडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.शुभांगी कोतकर, डॉ.डी.के. दळवेलकर, वाणी समाज अध्यक्ष जयवंत बागड, सोमनाथ कोठावदे, पंढरीनाथ कोठावदे, सुभाष जगताप, एस.आर. भदाणे, खारकर व ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा विमलबाई दशपुते उपस्थित होते.जिव्हाळा महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वाणी मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी प्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. यावेळी नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावीत यांचा साडी, चोळी, शालश्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जिव्हाळा महिला नागरिक संघाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.शिरोडे यांनी संघाचे महत्त्व, कायदे यावर माहिती दिली. तर आरोग्यावर डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.दळवेलकर, डॉ. शुभांगी कोतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी संघातर्फे ज्येष्ठ महिलांचा सत्कार करुन औक्षण सुनांनी केले व भेट दिली. प्रास्ताविक व अहवाल वाचन मालू दशपुते व रत्ना लोखंडे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे