व्यंकटराव रणधीर यांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST2021-05-07T04:37:57+5:302021-05-07T04:37:57+5:30

बुधवारी येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस़पी़डी़एम़ वरिष्ठ व डॉ. पां.रा. घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मवीर दालनात थोर स्वातंत्र्य सेनानी, ...

Unveiling of the statue of Venkatrao Randhir | व्यंकटराव रणधीर यांच्या पुतळ्याचे अनावरण

व्यंकटराव रणधीर यांच्या पुतळ्याचे अनावरण

बुधवारी येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस़पी़डी़एम़ वरिष्ठ व डॉ. पां.रा. घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मवीर दालनात थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशा रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल, संस्थेचे ट्रस्टी संजय गुजर, जि.प़च्या माजी सदस्या सीमा रंधे, ग.स़ बँकेचे संचालक शशांक रंधे, पुतळ्याचे शिल्पकार अशोक सोनवणे, नरेंद्र पटेल, भैय्या सुतार आदी उपस्थित होते़

प्राचार्य डॉ़ एस़ एन. पटेल, पुतळा शिल्पकार अशोक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक सोनवणे, इंजिनियर नरेंद्र पटेल, डिझायनर भैय्या सुतार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ़ एम़ व्ही़ पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य दिनेश पाटील, ए़ एस़ मराठे, संजय निकम, डॉ. कादरी, डॉ़ वर्मा, प्रा़ सोलंकी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Unveiling of the statue of Venkatrao Randhir