शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात तीन ठिकाणी एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:21 IST

देवपुर पोलिसांनी दिली घटनास्थळी भेट, घटनांची नोंद मात्र पोलिसात नाही

धुळे : धुळ्यात स्टेट बँकेचे तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेले एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला़ ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ यात केवळ खोलीच्या दाराचे नुकसान झाले असून मशिन आणि त्यातील रक्कम सुदैवाने सुस्थितीत असल्याचे समोर आले आहे़ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़स्टेट बँकेचे धुळे शहरात ठिकठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित आहेत़ आग्रा रोडवर देवपुरातील तलाठी कार्यालयाजवळ असलेले एटीएम मशिन, त्याच्या पुढे दत्त मंदिर परिसरात स्वामीनारायण मंदिराच्या रस्त्यावर असलेले एटीएम मशिन आणि गोंदूर रोडवर असलेल्या स्टेट बँक शाखेच्या शाखा शेजारील एटीएम असे तीन एटीएम मशिनकडे चोरट्यांनी लक्ष्य केंद्रीत केले़ एकही मशिन त्यांच्याकडून फुटलेले नाही़एटीएम मशिनमध्ये शिरल्यानंतर चाहुल लागताच चोरटे पसार झाले़ त्यांच्या हाती काहीही लागले नाही़ घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील आपल्या सहकारीसह तीन ठिकाणी तातडीने पाहणी करण्यासाठी निघाले़ मात्र एटीएम मशिन फोडण्याचा प्रकार झाला नसल्याचे त्यांना दिसून आले़ दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती़दरम्यान, देवपूर हद्दीत दोन आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन ठिकाणी पहाटेच्या वेळेस काही इसम हे एटीएम मशिनमध्ये घुसले होते़ पण, कोणत्याही प्रकारचे नुकसान त्यांच्याकडून झालेले दिसत नाही़ या तीनही ठिकाणी मी स्वत: जावून पाहणी करुन आलो आहे़ असे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे