शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या मारहाणीनंतर दोन तरुण बेपत्ता

By admin | Updated: March 20, 2017 23:45 IST

चित्रफीत ‘व्हायरल’ : कारवाईच्या मागणीसाठी ‘रास्ता रोको’; पोलिसासह तिघांविरुद्ध गुन्हा

साक्री : एका पोलिसाने गावातील साथीदारांच्या मदतीने एक महाविद्यालयीन विद्यार्थी व एक व्यावसायिक तरुण अशा दोघांना बेदम मारहाण  केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यातील दोषी पोलिसावर त्वरित कारवाई करण्याची मागणी बोदगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. कन्हैयालाल ब्रिजलाल ठाकरे (रा. बोदगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर कन्हैयालाल ठाकरे व तो परप्रांतीय व्यावसायिक बेपत्ता आहे.  कन्हैयालाल हा साक्री येथील विमलबाई महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो दहीवेल येथे मित्राच्या खोलीवर राहत होता. रविवारी रात्री दहीवेल औट पोस्टचे पोलीस सुनील कोतवाल व गावातील हिरामण माळी व महेंद्र बच्छाव यांनी त्याला जबर मारहाण केली. मात्र या मारहाणीमागचे कारण कळू शकलेले नाही. मारहाणीवेळी अज्ञात इसमाने या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर ही चित्रफीत  व्हायरल झाली. या चित्रफीतमध्ये कोतवाल हे कमरपट्टय़ाने कन्हैयालाल याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. इतर दोन व्यक्तींनीही त्याला बेदम मारहाण केल्याचे दिसते. या विद्याथ्र्याबरोबर दहीवेल येथे चायनीज खाद्यपदार्थ विकणा:या एका परप्रांतीय मुलालाही मारहाण झाली  आहे.  या घटनेतील पोलीस कर्मचारी याने पोलीस पोशाखात ही मारहाण करताना शर्टवर जर्किन घातले आहे. चित्रफितीत आदिवासी तरुण मारू नका, अशी विनंती पोलिसाला करताना दिसत आहे. ही चित्रफीत व्हायरल झाल्याने संबंधित तरुणाच्या गावातील आदिवासी ग्रामस्थांनी साक्री पोलीस ठाण्यात धाव घेऊन मारहाण करणा:या कर्मचा:याची चौकशी करून त्यास त्वरित निलंबित करावे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी  केली़ त्यानुसार, साक्री पोलिसात ब्रिजलाल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा:या तिघांविरुद्ध भादंवि कलम 341, 342, 343, 365, 452, 324, 323, 504, 506, 34 व अ़जा़ज़ अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा कलम सन 2015 चे ड (1)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल झाला़नातेवाइकांचा ‘रास्ता रोको’4सोमवारी सायंकाळी कन्हैयालाल ठाकरे या तरुणाच्या नातेवाइकांनी सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार पथके स्थापन केली असून ती अटकेच्या कारवाईसाठी रवाना झाली. लोकेशन घेऊन ते आरोपीस लवकरात लवकर अटक करतील. - नीलेश सोनवणे, उपअधीक्षक, साक्री विभागदहीवेल औट पोस्टचे कर्मचारी असलेले सुनील कोतवाल यांची काही दिवसांपूर्वी साक्री पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. तरीही कोतवाल हे दहीवेल येथे जाऊन काय करत होते? असा प्रश्न पुढे आला आहे.