शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबराव राठोडांच्या शोधासाठी दोन पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:11 IST

मोहन मराठे मृत्यू प्रकरण : अटकेतील तिघा पोलिसांना कोठडी, एकाचे निलंबन

दोंडाईचा : येथील मोहन मराठे मृत्यू प्रकरणी अटकेतील तिघा पोलिसांना शिंदखेडा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ तर, फरार असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या शोधासाठी २ पथके रवाना करण्यात आली़ तर एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले़गिरीधारीलाल नांनकराम रुपचंदानी यांच्या आॅइल मिल मध्ये ४ आॅक्टोबरला १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ८६ तांदळाचे कट्टे चोरीस गेले होते. या चोरी प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे यांच्याकडे होता. या तांदूळ चोरी प्रकरणात दोंडाईचा पोलिसांनी मोहन मराठे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी ७ आॅक्टोबर ला मोहन मराठे यांचा मृतदेह शहादा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.त्या प्रकरणाचा तपास सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविकिरण तुकाराम दरवडे यांच्याकडे सोपविण्यात आला़ यात संशयित आरोपी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव जांनकिराम राठोड, पोलीस कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल नंदलाल सोनवणे दोषी आढळलेत. तिघा संशयित पोलिसांना शुक्रवारी सीआयडीने अटक केली़ तपासाधिकारी तथा नंदुरबार सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र भावसार यांनी संशयित तिघा पोलिसांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी भावसार यांनी आरोपींना पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे, ते न्यायालयात मांडले. संशयित आरोपींकडून अ‍ॅड़ पी़ जी़ पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर शिंदखेडा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपींना १६ डिसेंबर पावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी पंजाबराव राठोड अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी सीआयडीने दोन पथक सज्ज केली असून त्यांना रवाना करण्यात आले आहे़ या प्रकरणातील संशयित वासुदेव जगदाळे या पोलिस कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे