शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांपासून सोनगीर बसस्थानकाचे त्रांगडे सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:40 IST

सोनगीर येथील लोटगाड्यांनी व्यापलेला, दुरवस्था झालेला बसथांबा.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील शिरपुरकडे जाणाºया बस थांबा जवळील प्रवाशी निवारा हा कचराकुंडीचे ठिकाण बनले आहे. सोनगीरसह परिसरातील नागरिकांचा सुमारे दोन दशकापेक्षा जास्त काळापासून बस स्थानकासाठी  संघर्ष सुरू आहे.  गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, बैठक, महामंडळाच्या अधिकाºयांकडून जागेचा पाहणी दौरा एवढयापुरताच हा येथील अद्ययावत बस स्थानकाचा प्रश्न मर्यादित राहिला आहे. त्यामुळे किमान येथे असलेल्या शिरपुरकडे जाणाºया थांबाजवळील महामंडळाचा प्रवाशी निवाºयाची दुरूस्ती करून प्रवाशांचे  होणारे हाल थांबवावे, अशी माफक अपेक्षा आहे.शिरपुर व धुळेकडे जाणाºया प्रवाशांसाठी थांबा परिसरात महामार्ग चौपदरीकरण करणाºया कंपनीने प्रवाशी निवारे बनवलेत मात्र ते थांब्यावर उपस्थित प्रवाशांच्या  तुलनेत तोकडे आहेत. यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी प्रवाशांना जवळ असलेल्या भुयारी मार्गात अथवा जवळील व्यवसायिक दुकानाचा आसरा घ्यावा लागतो. मात्र या मार्गावर नेहमी वाहनाची वर्दळ सुरु असते. यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, येथील शिरपुरकडे जाणाºया बस थांब्यावर महामंडळाचा पूर्वीपासूनचा एक जुना पिकअप शेड आहे. बºयाच वर्षापासून या पिकअप शेडच्या समोर  व्यावसायिक टपºयांचे अतिक्रमण होते. गेल्यावर्षी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मदतीने अतिक्रमित दुकाने हटवण्यात आली होती. यामुळे  दुर्लक्षित शेड नागरिकांच्या दृष्टीस पडू लागले. मात्र, सध्या असलेल्या शेडच्या भिंती तसेच वरील छपराची पार दुरवस्था झाली असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला पिकअप शेड सध्या निरुपयोगी ठरत आहे. या शेडची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. बस स्थानकासाठी जागादरम्यान येथे सर्व सर्वसुविधायुक्त बस स्थानक असावे, यासाठी ग्रामपंचायतीने  महामार्गालगत पोलीस ठाण्यासमोर  पाच एकर इतकी जागा आरक्षित ठेवली आहे. गेल्यावर्षी महमंडळाच्या अधिकाºयांनी याठिकाणी येऊन पाहणी देखील केली होती.  व लवकरच जागा ताब्यात घेऊन वरिष्ठस्तरावर वेगवेगळ्या मान्यता घेऊन नागरिकांसाठी अद्ययावत बसस्थानक तयार करण्यात येईल, असे आश्वासन  दिले होते. मात्र, स्थानकाची अजून प्रतिक्षाच आहे. प्रस्तावित अद्ययावत बस स्थानकचा प्रश्न सोडविण्यासाठी  माजी पं. स. सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच केदारेश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा माजी ग्रा.पं. सदस्य प्रमोद धनगर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Dhuleधुळे