छायाचित्रात बदल करून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: April 29, 2017 17:33 IST2017-04-29T17:33:07+5:302017-04-29T17:33:07+5:30

शनिवारी पहाटे एकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आह़े

Trying to make a difference to a minor girl by changing the photo | छायाचित्रात बदल करून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

छायाचित्रात बदल करून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 29 -  अल्पवयीन मुलीच्या छायचित्रात बदल करीत  ते मुलीला दाखवून तिच्याशी एका तरूणाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी शनिवारी पहाटे एकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आह़े
याबाबत कावठे येथे राहणा:या पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसात फिर्याद दिली आह़े त्यानुसार मुकेश विठ्ठल सोनवणे (रा़ कावठी) या तरुणाने मंगळवारी त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे छायाचित्र काढल़े त्या छायाचित्रांना गळ्यात हात टाकलेले स्वरूप देऊन ते  मुकेशने वेळोवेळी पीडित मुलीच्या जवळ येऊन तिला पुन:पुन्हा दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या घरासमोर अंगणातही घडला़
या प्रकरणी मुकेश सोनवणे याच्याविरूध्द सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड)  (1) (2) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11 (4) (5), 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Trying to make a difference to a minor girl by changing the photo