लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात १ जणाचा मृत्यू झाला आहे तर २६ जण जखमी झाले़ अपघाताची ही घटना शहरानजिक पारोळा चौफुली जवळ सोमवारी पहाटे घडली.मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरानजिक पारोळा रोड चौफुली जवळ पुलावर कांदे भरलेला एमएच १८ एए ०९५२ या क्रमांकाचा ट्रक स्टार्टर बिघडल्यामुळे महामार्गावरच उभा होता. त्यावेळी इंदौरहुन मुंबईकडे जाणाºया एमपी ०९ एफए ९७८७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले. ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या मदतीने आडवी झालेली ट्रॅव्हल्स उभी केली आणि प्रवाशांना आतमधून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आझादनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़
ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:08 IST