धुळ्यात वाहतूक कोंडीने श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 22:59 IST2019-11-28T22:59:30+5:302019-11-28T22:59:51+5:30

गटारीच्या कामांचा अडसर : दोन दिवसात काम पूर्ववत - प्रशासन

Traffic in the mist stopped breathing | धुळ्यात वाहतूक कोंडीने श्वास कोंडला

धुळ्यात वाहतूक कोंडीने श्वास कोंडला

धुळे : शहरातील कमलाबाई चौकात गेल्या पाच दिवसांपासून गटारीच्या कामांमुळे रस्ता खोदून ठेवल्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक जिल्हा परिषद, स्टेट बँकेकडून वळविण्यात आली आहे़ रस्ताचे काम प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असलेतरी वाहतुकीच्या कोंडीमुळे मात्र जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर वाहनधारकांचा श्वा कोंडला जात आहे़ समस्या नित्याची होत असल्यामुळे आपापसात वाद देखील होत असतात़ 
शहरातील कमलाबाई चौकात बाफना शाळेलगत फार पुर्वी पासून गटारीची रचना करण्यात आली आहे़ सध्या ही गटार घाणीने भरल्याने पाण्याचा प्रवाह व्यवस्थित होत नव्हता़ पर्यायाने गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले़ त्यात रस्ताच खोदून काढण्याची वेळ आल्याने या मार्गावरुन होणारी वाहतूक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, स्टेट बँकेकडून वळविण्यात आली आहे़ अगोदरच हा रस्ता निमुळता आहे़ बँकेत येणाºया नागरीकांची वाहने देखील या ठिकाणी रस्त्यावरच असतात़ परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे़ 

गटारीच्या कामांसाठी रस्ता खोदावा लागला आहे़ काम प्रगतीपथावर असून लवकरच काम मार्गी लावले जाईल़ 
- एजाज शहा, उपअभियंता

Web Title: Traffic in the mist stopped breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे