शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दोंडाईचात भरदिवसाचा घरातील थरार, चाकूचा धाक दाखवून दागिने हिसकाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 10:33 PM

लूट झालेले दागिने ५० हजार रुपये किंमतीचे

दोंडाईचा : विक्रीला काढलेले घर बघण्याचा बहाण्याने घरात घुसून लहान मुलाला चाकूचा धाक दाखवित महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना भरदुपारी २ वाजेच्या सुमारास दोंडाईचा शहरात घडली़ लूट झालेले दागिने ५० हजार रुपये किंमतीचे आहेत़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले़दोंडाईचा येथील शिवकॉलनीतील प्लॉट क्र १७ येथे हेमंत पवार यांचे घर आहे. या घरात रोटरी इंग्लिश स्कूलला उपशिक्षक असलेले भरत निंबाजी पवार भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत. ते शाळेत गेले असतांना पत्नी जयश्री व आठ वर्षाचा मुलगा घरात होते. हेमंत पवार यांचे घर विक्रीला काढले आहे. घर खरेदी करावयाचे असून आम्हास घर बघायचे आहे, या बहाण्याने एक पुरुष, एक महिला व एक मुलगा यांनी घरात प्रवेश केला. जयश्री पवार या किचन दाखवित असताना त्या पुरुषाने गेट लावले तर त्याच्या सोबतच्या मुलाने कपाट उघडले. त्याचवेळी झोपलेल्या मुलाला चाकू लावून त्या महिलेला अंगावरील दागिने काढून घेण्याचे सांगितले़ सोन्याचे मंगळसूत्र व कानातल्या रिंगा हिसकावून घेतल्या. जयश्री पवार जोरात आरोळी मारतील या भीतीने डोक्यात चाकूसारखी वस्तू मारून फेकली. व मोबाईल फेकून देऊन त्याची तोडफोड केली. जयश्री पवार या महिला अतिशय घाबरल्या होत्या.दरम्यान भरत पवार घरी आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली़ घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलीस उपनिरीक्षक डॉ़ संतोष लोले व पथकाने भेट दिली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे