धुळ्याजवळ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 05:20 IST2022-05-17T05:19:08+5:302022-05-17T05:20:30+5:30

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, मित्र नगर जवळील फॅमिली ढाबा गार्डन समोरील रस्त्यावर हा अपघात झाला.

three vehicles crash on highway near dhule four died on the spot and two injured | धुळ्याजवळ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार, दोन जखमी

धुळ्याजवळ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार, दोन जखमी

धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, मित्र नगर जवळील फॅमिली ढाबा गार्डन समोरील रस्त्यावरती रात्री 12 वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात होऊन यात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. 

घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस कर्मचारी क्रेनच्या मदतीने ट्रक च्या खाली अन्य एक जण दाबला गेलेला आहे त्याला काढण्याचे कार्य करण्याच्या मदतीने सचोटीने करत आहेत. अन्य दोन जखमींना टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून टोल कर्मचाऱ्यांनी मदत कार्य करीत चक्कर वर्डी येथील हिरे रुग्णालयामध्ये उपचारार्थ रवाना केले आहे.

Web Title: three vehicles crash on highway near dhule four died on the spot and two injured

टॅग्स :Accidentअपघात