Accident: बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 14:25 IST2021-08-21T14:24:09+5:302021-08-21T14:25:02+5:30
Accident News: शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ राष्टीय मार्गावर आर्टिका गाडीला अपघात होऊन कन्नड येथील तीन जण जागीच ठार झाले असून चालकासह इतर चार गंभीर जखमी झाले आहेत.

Accident: बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
शिंदखेडा :- तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ राष्टीय मार्गावर आर्टिका गाडीला अपघात होऊन कन्नड येथील तीन जण जागीच ठार झाले असून चालकासह इतर चार गंभीर जखमी असून जखमीवर धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर अपघात रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास झाला असल्याचे शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे यांनी दिली असून नेमका अपघात कसा घडला याचा शोध शिदखेडा पोलीस घेत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर बाभळे फाट्यावर दि 20व 21 तारखेच्या मध्यरात्री 11 ते 12 च्या सुमारास 20 ते 30 वर्षाचे 7 तरुण कन्नड कडून ऊज्जेन कडे आर्टिका गाडी क्र M.H.22 U 7128 ने देव दर्शनाला जात असताना अपघात झाला अपघातात आर्टिका गाडीने रस्त्यावरच पलटी मारत रस्त्यातच पडली होती महामार्ग पोलिसांनी लागलीच जखमींना धुळे येथे हलवले व क्रेनच्या साहाय्याने गाडी बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली सदर अपघातात कन्नड येथील गणेश भगवान हिरे वय 26 वर्ष, पवन विजू जाधव वय 23 वर्ष, दोन्ही रा कन्नड व सचिन राठोड वय 24 वर्ष रा उमरखेड तांडा ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद हे जागीच ठार झाले असून गाडीचा चालक गौरव कांबळे व इतर तीन (नाव महितनाही) गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात गाडीने रोडवरच दोन पलटी खाल्याने गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे नेमका अपघात कसा झाला हे जखमी झालेले चालक इतर जखमी सांगू शकणार असून ते सद्या सांगण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तसेच टायर फुटल्या मुळे ही अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज शिंदखेडा पोलिसाचा आहे