चोपडाजवळ अपघातात ३ ठार, १ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 12:12 IST2019-05-12T12:12:28+5:302019-05-12T12:12:51+5:30
शिरपूर : इंडिका गाडी कंटनेरमध्ये अडकल्याने गाडीचा चक्काचूर

चोपडाजवळ अपघातात ३ ठार, १ गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूर-चोपडा मार्गावरील काजीपूरा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाºया इंडिका गाडीने समोरून जाणाºया कंटनेरवर धडकल्याने इंडिका गाडीचा चक्काचूर होवून ३ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर दुखापती झाल्यामुळे अधिक उपचारासाठी चोपडा येथून हलवून जळगांव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: धडक एवढी जबरदस्त होती की, इंडिका गाडी पूर्णत: कंटनेरमध्ये अडकून पडल्यामुळे जेसीबी मशिनने बाहेर काढण्यात आले़
रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर शिरपूर रस्त्यावरील काजीपूरा फाट्यानजिक हा अपघात झाला़ इंडिका (क्रमांक एम़एच़१४-सीएक्स-९०१३^) गाडीत नामदेव गुलाब कोळी (४२) रा़मांजरोद, अनिल दशरथ जाधव (२२) रा़बभळाज, किशोर गजानन बिºहाडे (३८) रा़भाटपुरा व सागर नरेंद्र पाटील (२२) रा़अजनाड असे चौघे जण येत होते़ चालक अनिल जाधव हा गाडी भरधाव वेगाने चालवित असतांना झोपेची डुलकी आल्यामुळे समोरून येणारा कंटनेरवर (गाडी क्रमांक एचआर-५५-एन-४११०) जावून धडकला़ अपघात एवढा जबरदस्त होता की, इंडिका गाडी चक्क कंटनेरच्या पुढील भागात चक्काचूर होवून पूर्णत: दाबली गेली़ त्यामुळे गाडीतील नामदेव गुलाब कोळी रा़मांजरोद, अनिल दशरथ जाधव रा़बभळाज व किशोर गजानन बिºहाडे रा़भाटपुरा हे तिघे जण दाबले गेल्यामुळे जागीच ठार झालेत़
घटना घडताच कंटनेर चालक फरार झाला़ काही वेळानंतर ये-जा करणाºया वाहनांनी जवळील हॉटेल चालकांना अपघात झाल्याचे वृत्त सांगितल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली़ तोपर्यंत अपघातातील मयत इंडिका गाडीतच अडकून पडले होते़ जेसीबी मशिन आणून कंटनेर लावून इंडिगा बाहेर काढल्यानंतर गाडीतील मयतांना बाहेर काढण्यात आले़ त्यात सागर नरेंद्र पाटील रा़अजनाड हा गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, प्रकृती चिंत्ताजनक असल्यामुळे त्यास लगेच जळगांव येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले़
घटनेचे वृत्त मयतांच्या आप्तजणांना कळताच अनेकांनी घटनास्थळी व रूग्णालयात गर्दी केली़ इंडिगा गाडीतील चौघे जण हातेड येथे मित्रांकडे गेले होेते़ त्याठिकाणी रात्रभर ते मित्रांसोबत गप्पा-गोष्टींमध्ये जागे असावेत़ त्यामुळे पहाटे त्यांना गाडी चालविताना डुलकी लागली असावी आणि यातून हा अपघात घडला असावा अशी घटनास्थळी चर्चा होती़