नगर-पुणे मार्गावर अपघात, धुळ्याचे तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:27 IST2019-06-11T11:27:33+5:302019-06-11T11:27:57+5:30

पहाटेची घटना : उभ्या ट्रकवर स्कार्पिओ आदळली

Three killed in accident on city-Pune road | नगर-पुणे मार्गावर अपघात, धुळ्याचे तीन ठार

नगर-पुणे मार्गावर अपघात, धुळ्याचे तीन ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पुण्याकडून नगरकडे जाणा-या मार्गावर जातेगाव फाट्याजवळ एमएच २२ एए ५२४ क्रमांकाचा ट्रक उभा होता़ या ट्रकवर एमएच १८ एजे ८४४३ क्रमांकाची स्कार्पिओ पाठीमागून येऊन जोरदार आदळली़ अपघाताची ही घटना पहाटेच्या सुमारास झाली़ या अपघातातील मयतांमध्ये ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (३०, रा़ फिरदोस नगर, धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (२०) आणि इरफान शयशोदोहा अन्सारी (२०) (दोन्ही रा़ मच्छीबाजार, धुळे) या तिघांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ तर अदनान निहाल अन्सारी (२१, रा़ तिरंगा चौक, धुळे) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ त्यानंतर अल्पावधीतच पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली़ अपघाताची माहिती धुळ्यात येताच फिरदोस नगर आणि मच्छीबाजार भागात शोककळा पसरली होती़ 

Web Title: Three killed in accident on city-Pune road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.