प्रत्येक घरावर राहणार आता ‘तिसरा डोळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:09 IST2019-09-25T23:04:10+5:302019-09-25T23:09:24+5:30
स्वच्छता देखरेख प्रणाली : शिरपूर, दोडाईचा, शिंदखेडानंतर धुळे मनपाचा देशात पहिल्यांदा उपक्रम

dhule
चंद्रकांत सोनार।
धुळे : शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी आता घरोघरी जावून कुटूंबाचा सर्र्वक्षण करण्याची आवश्यकता राहणार नाही़ कारण महापालिका आता प्रत्येक घरांना स्वच्छता देखरेख प्रणाली (आरएफआयडी) डिजीटल चीप बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे प्रत्येक घराच्या कुटूंबाची माहिती मनपाला यापुढे सहजरीत्या मिळणार आहे़ दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूरनंतर धुळे शहरात पहिल्यांदा राबविणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे़
मालमत्ता बसविणार चीफ
प्रत्येक घरांना डिजीटल चीफ बसविण्यासाठी इंदूर येथील समाधान टॅक्णोलॉजी कंपनीला १ कोटी ७२ लाख ८४ हजार ४० रूपयांचा ठेका देण्यात आला आहे़ त्यानुसार शहरातील ७० ते ८० हजार मालमत्ता धारकांच्या घराबाहेर आरडीएफआय चीफ बसविण्यात येणार आहे़ एका घरासाठी प्रत्येकी २१६ रूपये किंमत मनपाला ठेकेदाराला द्यावी लागणार आहे़ तर देखभार दुरूस्तीसाठी तीन वर्षापर्यत जबाबदारी ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे़ आचार संहिता लागण्याआधी स्थायी समितीच्या बैठकीत विषयांला मंजूर देऊन कार्यादेश देण्यात आले आहे़
मनपात राहणार मुख्यसर्व्हर
प्रत्येक प्रभागातील नागरिकांची घरांना बसविण्यात आलेल्या डिजीटल चीफचा एकत्रित डाटा संग्रहित करण्यासाठी महापालिकेत मुख्यसर्व्हर बसविण्यात येणार आहे़ मलेरिया, फॉगिंग, पोलिओसह इतर लसीकरण, जनगणना, कुटूंब लसीकरण, शासकीय योजना यांची माहिती देण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी त्या घरांपर्यत पोहचला किंवा नाही़ यांची माहिती चीफव्दारे मिळू शकते़
घंटागाडीवर देखील वॉच
घरापर्यत घंटागाडी पोहचत नसल्याची तक्रारी सोडविण्यासाठी घराबाहेर ही चीफ बसविण्यात येणार आहे़ त्यामुळे तुमच्या घरासमोरून केव्हा व किती वाजता कोणती घंटागाडी गेली याची माहिती मनपाला मिळणार आहे़ तर प्रभागात येणाऱ्यास घंटागाडी वेळ, मार्ग, ठिकाणाची माहिती मिळण्यासाठी नागरिकांना चीफसमोरील बारकोड मोबाईलव्दारे स्कॅन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकते़ तसेच तक्रारी देखील दाखल करता येवू शकते़
घंटागाडीला जीपीएस प्रणाली
घंटागाडी कुठे आहे याची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे़ त्यामुळे आवश्यकता भासल्यास चालकाशी संपर्क साधता येणार आहे़ घंटागाड्यांच्या सायरनमुळे नागरिकांना आगाऊ सूचना मिळते. त्यामुळे शहरातून १०० टक्के कचरा संकलन करणे शक्य झाले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांना मास्क, ग्लोव्हज देण्यात आले आहेत.
देशात पाहिली महापालिका
तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा शिरपूर, दोंडाईचा, शिंंदखेडा या तीन नगरपालिकांमध्ये ही प्रणाली वापरण्यात आली़ त्यानंतर आता धुळे मनपा प्रत्येक घरांना चीप बसविणार आहे़ या प्रणालीचा वापर करणारी धुळे महापालिका देशातील एकमेव महापालिका ठरणार आहे़
सुरक्षित विलगीकरण
महापालिकेतर्फे संकलित कचºयाच्या विलगीकरणाकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. त्यासाठी आजवर शहरात डस्टबीनचे वाटप करण्यात येणार आहे़ घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठी वेगळे विभाग आहेत. ओला कचरा पीटमध्ये टाकून कंपोस्ट खतनिर्मिती केली जाणार आहे़ त्यामुळे भविष्यात महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे़
सुविधा सोप्या
आरोग्य विभागामार्फेत विविध आरोग्य सेवा पुरविण्यात येतात़ त्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना घरो-घरी जावून माहिती जमा करावी लागते़ काहीचे घर बंद असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही़ तर शासनाचे देखील योग्य सर्व्हे होत नाही़ त्यामुळे भविष्यात या डिजीटल चीपच्या माध्यमातून महापालिकेला शहरातील कुटुंबांची माहिती सहज मिळू शकते़