चोरट्यांनी ठोकला साक्री रोड परिसरात मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:46 IST2019-11-16T22:45:52+5:302019-11-16T22:46:15+5:30
शहर भागात चोरीचे सत्र थांबता थांबेना । अजबे नगरासह तुळजाई नगरातील घटना, हजारोंचा ऐवज लांबविला

चोरट्यांनी ठोकला साक्री रोड परिसरात मुक्काम
धुळे : चोरट्यांनी सध्या शहरातील साक्री रोडवरील विविध कॉलनी भागात आपला मुक्काम ठोकला असल्याचे घडणाºया घटनांवरुन दिसून येत आहे़ साक्री रोडवरील अजबेनगर आणि तुळजाई नगरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे़ घरमालक गावाला गेले असल्यामुळे नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही़ पण, हजारो रुपयांचा ऐवज लांबविला असल्याचे सांगण्यात येत आहे़
गेल्या आठवड्यांपासून धुळ्यातील विविध भागात चोºयांचे प्रमाण वाढलेले आहे़ पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढविले असलेतरी चोरट्यांनी हातसफाई करण्याचे काम काही थांबविलेले दिसत नाही़ साक्री रोडवरील संगमा चौक परिसरात असलेल्या अविनाश साळवे हे सुरत येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ त्यांच्या घरातून नेमके काय गेले हे स्पष्ट होऊ शकले नसलेतरी हजारो रुपयांचा ऐवज गेल्याचे दिसत आहे़
तर त्याच परिसरात असलेले अजबेनगरात वैशाली मैदासे यांचे घर देखील बंदच होते़ घर बंद असल्याने चोरट्यांनी याचा फायदा उचलला़ घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत घरातील गोदरेजचे कपाटही फोडले़ कपाटातील ऐवज चोरुन नेला आहे़ नेमका किती आणि कोणता ऐवज लंपास केला हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकलेला नव्हता़
घटनांची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे़ दोनही घर मालकांना तातडीने कळविण्यात आलेले आहे़ त्यामुळे ते आल्यानंतरच चोरीला कोणत्या वस्तू गेल्या स्पष्ट होणार आहे़ तत्पुर्वी हजारो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर येत आहे़
दरम्यान, सातत्याने घडणाºया घटनांमुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे़
चोरट्यांनी हातसफाई करण्यापुर्वी कुठूनतरी दुचाकी चोरुन आणली़ दोन ठिकाणी डल्ला मारल्यानंतर चोरीच्या या दुचाकीचा पुरेपूर लाभ घेत ऐवज लंपास करीत महिंदळे शिवारात ही दुचाकी फेकून दिली आणि त्यानंतर चोरीचा जो काही ऐवज होता तो घेऊन पोबारा केला़ शहर पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही दुचाकी मिळून आली आहे़ ही चोरीची असल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे़