वकीलाच्या घरी चोरट्यांची हातसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:47 IST2019-11-25T22:46:43+5:302019-11-25T22:47:06+5:30
धुळे : ओसवाल नगरातील घटना

वकीलाच्या घरी चोरट्यांची हातसफाई
धुळे : देवपुरातील नगावबारी परिसरात राहणाºया वकीलाच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याचे सांगितले जात आहे़ हा प्रकार रविवारी रात्री घडला असून सोमवारी सकाळी उजेडात आला़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविण्यात आली़
देवपुरातील कल्याणी बंगलाच्या मागे ओसवाल नगरातील साहेब अपार्टमेंटमधील प्लॉट नंबर १२ मध्ये राहणारे अॅड़ राजेश विष्णू सोनवणे यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटात ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले़ लांबविलेल्या ऐवजमध्ये १७ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ५ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसुत्र, ६ ग्रॅम वजनाच्या कानातल्या रिंगा, २ ग्रॅम वजनाचे ओम पदक असे मिळून सुमारे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत़
चोरीची ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर देवपूर पोलिसांना कळविण्यात आले़ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी करीत पंचनामा केला़ यानंतर अॅड़ सोनवणे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ पोलिसांचा तपास सुरु आहे़